shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर महाविद्यालयाचा नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम.मुलाखतीसाठी आलेल्या सर्व उमेदवारांचे रोपटे देऊन स्वागत


इंदापूर महाविद्यालयाचा नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम.
मुलाखतीसाठी आलेल्या सर्व उमेदवारांचे रोपटे देऊन स्वागत
 इंदापूर प्रतिनिधी
 इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये विविध विभागांच्या तसेच विविध विषयांच्या तासिका तत्वावरील शिक्षक पदाच्या नियुक्तीसाठी आलेल्या सर्व उमेदवारांचे स्वागत रोपटे देऊन करण्यात आले. राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते मुलाखतीस आलेल्या उमेदवारांना रोपटे देण्यात आले.
  यावेळी संस्थेचे सचिव मुकुंद शहा, सहसचिव प्रा. बाळासाहेब खटके, खजिनदारॲड.मनोहर चौधरी, संचालक तुकाराम जाधव, पराग जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे या वेळी उपस्थित होते.
   इंदापूर महाविद्यालय नावीन्यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम राबवित असते.महाविद्यालयामध्ये ऑक्सीजन पार्कची निर्मिती केली असून माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५००८ बेल व देशी रोपांचे वाटप केले आहे या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांचे स्वागत रोपटे देऊन करण्यात आले.
  एकूण २०० पेक्षा जास्त उमेदवारांना वेगवेगळ्या देशी जातीच्या वृक्षांच्या रोपाचे वाटप करण्यात आले.यामध्ये बेल, भेंडी, वड, पिंपळ, जाई, जुई, मोगरा, कन्हेर, काटेसावर  कडूनिंब या व अशा वृक्षांचा समावेश होता. मुलाखतीला आलेला प्रत्येक उमेदवार यामुळे आनंदित होता.
close