ग्लोबलनगरी फाऊंडेशनचा उल्लेखनीय उपक्रम
प्रतिनिधी : आसावरी वायकर
देहरे : दि . १२ / नगर तालुक्यातील देहरे येथील
माऊली सेवा प्रतिष्ठान, मनगाव साठी ग्लोबलनगरी फाऊंडेशन यांनी दिलेल्या अत्याधुनिक कार्डियाक अँम्ब्युलन्सचा दि .११ रोजी लोकार्पण सोहळा मा. पद्मश्री पोपटराव पवार मा. नरेंद्रजी फिरोदिया यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला .
या कार्यक्रम प्रसंगी पद्मश्री . पोपटराव पवार साहेब , नरेंद्रजी फिरोदिया साहेब, डॉ . वसंत कटारिया साहेब, आबाजी पठारे साहेब, माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक आदरणीय डॉ. राजेंद्र धामणे, तसेच डॉ. सुचेता धामणे,पंचायत समिती सदस्य व्हि,डी, काळे (देहरे गट), नांदगावचे लोकनियुक्त सरपंच सखाराम सरक, ग्रामपंचायत शिंगवेनाईकचे विद्यमान सदस्य अमोल डोळस, महेंद्र कोळकर, तसेच निलेश लंके प्रतिष्ठान शाखा अध्यक्ष जावेद सय्यद, सामाजिक कार्यकर्ते हरिश शेळके, युवा उद्योजक आयाज सय्यद, युवानेते अनिकेत डोळस, तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच जगभरातील ग्लोबलनगरी परिवार उपस्थित होते . ग्लोबलनगरी परिवार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले .
सदर कार्डियाक अँम्ब्युलन्स अत्याधुनिक उपकरणांनी व जीवरक्षक प्रणालीने सज्ज असुन त्यासोबत डॉक्टर व पॅरामेडिक उपलब्ध असतील. ना नफा ना तोटा या तत्त्वावर गरजूंसाठी ही सेवा माऊली सेवा प्रतिष्ठान तर्फे उपलब्ध करुन दिली जाईल.

