shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर्षवर्धन पाटील यांचेकडून बावडा येथे आण्णाभाऊ साठे स्मारकाच्या कामाची पाहणी .

हर्षवर्धन पाटील यांचेकडून बावडा येथे आण्णाभाऊ साठे स्मारकाच्या कामाची पाहणी .
इंदापूर: प्रतिनिधी (दि.१२ सप्टेंबर २०२१)
        बावडा येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या ग्रामपंचायतीमार्फत सध्या चालु असलेल्या विविध कामांची माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.१२) पाहणी केली व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
           बावडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी दि.१ ऑगस्ट रोजी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. सध्या स्मारकाच्या ठिकाणी चबुतरा, संरक्षक भिंत, स्वागत कमान आदी कामे वेगात चालु असून प्रगतीपथावर आहे. या चालू असलेल्या कामाबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
             बावडा गावच्या वैभवात भर पडेल असे  साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे हे स्मारक उभारले जात आहे. या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली. 
           या प्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव आवारे, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. 


close