गोखळी येथील लसीकरणास ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद- उपसरपंच सचिन तरंगे.
गोखळी येथे कोरोना प्रतिबंधक २३७ लस नागरिकांना देण्यात आल्या.
इंदापूर प्रतिनिधी: कोरोणा संक्रमणाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शासनाने नियोजित केलेल्या लसीकरण यास वाढता प्रतिसाद पाहता ( दि.११ सप्टेंबर) रोजी ग्रामपंचायत गोखळी या ठिकाणी
२५० लस उपलब्ध झाल्या होत्या त्यापैकी २३७ नागरिकांना सकाळी दहा ते पाच या वेळेत देण्यात आल्या. गोखळी ग्रामपंचायतीचे सरपंच अलका बापू पोळ, उपसरपंच सचिन तरंगे, माजी सरपंच बजरंग राऊत, सर्जेराव वाघमोडे, बाप्पू पोळ, महानवर गुरुजी, हरणावळ गुरुजी, बाळासाहेब चितळकर, राजाराम तरंगे. तुकाराम वाघमोडे, ग्रामसेविका जाधव मॅडम, उपकेंद्राच्या डॉ. महामुनी मॅडम, आरोग्य सेवक विक्रम घईरवार, आरोग्य सेविका सुलभा काळे,आरोग्य सहाय्यक सेवक उतेकर, आशा स्वयंसेविका वर्षा वाघमोडे, अंगणवाडी सेविका पोळ मॅडम, इत्यादी उपस्थित होते.
उपसरपंच सचिन तरंगे म्हणाले की,राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून व जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले यांच्या विशेष प्रयत्नातून गोखळी गावाला २५० लसीकरणाचे डोस देण्यात आले. यावेळी गोखळी ग्रामस्थांकडून विशेष प्रतिसाद मिळाला. सदर पहिला व दुसरा डोस देण्यात आला . अशी माहिती त्यांनी सांगितली.

