shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे राजवर्धन पाटील यांच्या हस्ते चायनीज हटचे उदघाट्न .

इंदापूर येथे राजवर्धन पाटील यांच्या हस्ते चायनीज हटचे उदघाट्न .
इंदापूर: प्रतिनिधी 
            इंदापूर येथे नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते चायनीज हट हॉटेलचे उदघाट्न बुधवारी (दि. ८) उत्साही वातावरणात करण्यात आले. आय कॉलेज समोर हे चायनीज हट इंदापूरकरांच्या सेवेसाठी आजपासून सज्ज झाले आहे.
       प्रारंभी सागर पेटकर, विनोद पेटकर, दीपक पेटकर, निलेश पेटकर, हेमंत बनसुडे, अमित व्यवहारे, आकाश व्यवहारे यांनी राजवर्धन पाटील व मान्यवरांचे स्वागत केले. इंदापूर शहर वाढत असून, युवकांनी कल्पकतेने विविध व्यवसाय करून जिद्द व चिकाटीने उज्वल भविष्य घडवावे, असे राजवर्धनदादा पाटील यांनी संगितले.
 
यावेळी ,अभिनेत्री मयुरी मोडक, युवा नेते अमोलराजे इंगळे,  शिवसेना शहराध्यक्ष मेजर महादेव सोमवंशी, उद्योजक रामभाऊ चव्हाण.समीर वनवे ,
प्रशांत शेटे, कुबेर पवार, दुर्गा शिंदे, युवक वर्ग व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
यावेळी अभिनेत्री मयुरी मोडक, युवा नेते अमोलराजे इंगळे,    उद्योजक रामभाऊ चव्हाण आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
______________________________
फोटो :- इंदापूर येथे राजवर्धन पाटील यांच्या हस्ते   चायनीज हट हॉटेलचे उदघाट्न करण्यात आले.
close