shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तृतीयपंथीयांनी केली मंगळागौर साजरी..!




विनया मेढेकर ।  पनवेल 
मंगळागौर या सणाची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. पनवेलमधील रत्नमाला कर्णबधिर मतिमंद विद्यामंदिर यांच्यातर्फे बुधवारी कळंबोली येथे तृतीयपंथीयांनी मंगळागौर साजरी केली. शाळेतील कर्णबधिर मतिमंद विद्यार्थ्यी, तृतीयपंथीय यांच्यासोबत मंगळागौर साजरी करण्यात आली. 


स्त्रीलिंग पुलिंग याप्रमाणे नपुंसक लिंग हा एक प्रकार आहे. त्यांनाही माणूस म्हणून जगण्याचा आणि समाजात जगण्याचा अधिकार आहे हा विचार करून समाजात जागरुकता वाढावी या हेतूने शाळेचे प्रमुख अमोल आंबेडकर आणि माधुरी आंबेडकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होते. शाळेतील सर्व कर्णबधिर विद्यार्थी तसेच मतिमंद विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.

कार्यक्रमामुळे तृतीयपंथी ज्ञानेश्वर बनकर, अनिकेत कुळकर्णी,  जित पवार उपस्थित होते. तसेच शाळेचे हितचिंतक सहकारी बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पल्लवी निंबाळकर या उपस्थित होत्या.
close