shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अचला झवर यांची" एआईएमए रत्न पुरस्कार" साठी निवड...!



वांबोरी ।  प्रतिनिधी :
एआईएमए पुरस्कृत दरवर्षी प्रमाणे आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून कोरोना काळात वैद्यकीय व  सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील सौ.अचला जितेंद्र झवर यांची 'एआईएमए रत्न' पुरस्कार साठी  निवड झाली आहे. 

अचला झवर या आयुष इंटरनेशनल मेडिकल एसोसिएशन अहमदनगर जिल्हा योग अध्यक्ष आहेत, तसेच महाराष्ट्र माहेश्वरी महिला संगठन च्या स्वास्थ्य समितित सहसंयोजिका आहेत. सकाळ माध्यम समूहा च्या तनिष्का सदस्या आहेत, तसेच बेंगलुरु संस्थेच्या आर्ट ऑफ लिविंग योग टीचर आहेत. २७ सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह औरंगाबाद येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन हे एक जागतिक स्तरावरील संघटन आहे.

 या संघटनेत आयुर्वेद, होम्योपैथी, एक्यूपंक्चर ,एक्यूप्रेशर आणि नेचुरोपैथी यां प्याथी चा समावेश आहे . या असोसिएशनचे व्हाइस चेयरमैन डॉ. नितिन राजे पाटिल आहेत. त्यांनी सदर निवडीचे पत्र दिले आहे.

नुकतेच राहुरी तहसीलदार एफ आर शेख व तालुका अधिकारी डॉ. दीपाली गायकवाड  यांच्या हस्ते अचला झवर यांना  कोरोना योद्धा चे प्रमाणपत्र देऊन  सम्मानित करण्यात आले. तालुक्यात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
close