shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सार्वजनिक गणपती व घरगुती गणपती विसर्जनाच्या अनुषंगाने ,एरंडोल नगर पालिकेतर्फे नागरिकांना आवाहन...!!



      एरंडोल/प्रतिनिधी
एरंडोल शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात एरंडोल नगर पालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे की स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियान याअंतर्गत कोविड-१९ प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सार्वजनिक गणपती व घरगुती गणपती विसर्जन याबाबत शासनाने नेमून दिलेल्या निर्बंधामुळे विसर्जनाच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याकरिता नागरिकांच्या सोयीसाठी दि. १९/०९/२०२१ रविवार (अनंत चतुर्दशी) रोजी, एरंडोल नगरपरिषदेतर्फे शहरात चार ठिकाणी गणपती मूर्ती संकलन व निर्माल्य संकलनाची व्यवस्था खालील प्रमाणे करण्यात येणार आहे.
१)मरिमाता चौक
२) म्हसावद नाका
३) कासोदा गेट
४) जुने पद्मालय तलाव (पिंप्री रोड) येथे करण्यात येणार आहे
तसेच जमा होणारे निर्माल्य यातून एरंडोल नगरपरिषदद्वारे खत निर्मिती करण्यात येणार आहे
तसेच नगरपरिषद द्वारे संकलन केलेल्या गणेशमूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे तरी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे.
close