प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तथा युथ रिपब्लिकन पक्ष केज तालुका अध्यक्ष पदी केज शहरातील क्रांती नगर भागातील युवा कार्यक्रते विशाल मस्के यांची पक्षाचे प्रणेते श्रद्धेय मनोज भाई संसारे यांनी निवड केली आहे.
विशाल मस्के हे क्रांती नगर भागातील जनतेच्या प्रत्येक अडचणी वेळी मदतीसाठी धाऊन जाऊन मदत करणारा युवक म्हणून या भागात परिचित आहे. या अधी माजी नगरसेवक लक्ष्मण जाधव व सद्यस्थितीत अझहर इनामदार यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला आहे. वंचित समाज घटकांसाठी त्यांची धडपड व कार्य पाहून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तथा युथ रिपब्लिकन पक्षाचे प्रणेते मनोज संसारे यांनी दखल घेऊन विशाल मस्के यांची केज तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
या निवडीबद्दल आमच्याशी संवाद साधला असता त्यांनी पुढील प्रमाणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझी निवड केल्या बद्दल मी श्रध्देय.पक्ष्याचे प्रणेते मनोज (भाई)संसा
प्रदेशाध्यक्ष विजयदादा साळवे,आणि बीड जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब शिनगारे ,बीड जिल्हा उपाध्यक्ष सतीश पायाळ बीड जिल्हा उपाध्यक्ष दीपक गायकवाड यांचे मनस्वी आभार मानतो.या पुढील काळात केज तालुक्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची बांधणी करून पक्ष बळकट आणि मजबूत करून माझी जबाबदारी प्रामाणिक पणे पार पाडण्याचा प्रयत्न करील. माझ्या वर विश्वास दाखवल्या बद्दल स्विभिमानी रिपब्लिकन पक्ष तथा युथ रिपब्लिकन च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानतो असे म्हटले आहे.
विशाल मस्के यांची केज तालुकाध्यक्ष स्विभिमानी रिपब्लिकन पक्ष तथा युथ रिपब्लिकन केज पदी निवड झाल्यानंतर जिल्हा उपाध्यक्ष दीपक गायकवाड,केज युवक तालुका अध्यक्ष विकास खंडाळे तसेच अनेकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर अझहर यांनी विशाल मस्के यांच्या सोबत प्रत्येक सामाजिक कार्यात त्यांच्या पाठिशी असेल असे म्हटले आहे.



