shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अजब प्रशासनाचा गजब कारभार ; तीन वर्षापूर्वीच्या मयताला केले लसीकरण ,शेरी चिखलठाण मधील प्रकार..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतिनिधि- दिपक हरिश्चंद्रे.
राहुरी: कोरोणावर मात करण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे त्यामुळे प्रत्येकाने लसीकरण केले पाहिजे त्याशिवाय कोरोणा हद्दपार होणार नाही असे शासनाचे आदेश आहे मात्र तीन वर्षापूर्वी मयत झालेल्या आपल्या वडिलांचे कोरोना लसीकरण झाल्याचा मेसेज मोबाईल मध्ये  धडकल्या मुळे राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण मधील त्या मुलाला मात्र आश्चर्याचा धक्काच बसला. ज्या मयत व्यक्तीला लसीकरण झाले त्यांचे नातेवाईक अद्यापही लसीकरणापासून वंचित आहेत मात्र मयत व्यक्तीला लसीकरण केल्याचा  मेसेज आल्या मुळे एकच खळबळ उडाली असुन तालुक्यात चाललेला लसीकरणाचा सावळागोंधळ पुन्हा एकदा  चव्हाट्यावर आला आहे.
संपुर्ण जगाने सध्या तालिबानी अतिरेक्यांचा ज्याप्रमाणे धसका घेतला आहे त्याच प्रमाणे कोरोन विषाणू ला हद्दपार करण्यासाठीही नवीन योजना तालुक्यातील आरोग्य  विभागाने अवलंब केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
यामध्ये मयत झालेल्या व्यक्तींना सुद्धा कोरोणाचे लसीकरण केले असल्याचा मेसेजमुळे परिसरातुन कोरोणा समुळ नष्ट होईल अशी चर्चा पसरली आहे
राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये कोरोणा विषाणूवर नियंत्रणासाठी शासनाकडून  लसीकरण सुरू आहे यामध्ये दरम्यान बुधवारी दिनांक दोन 1 सप्टेंबर रोजी शेरी चिकलठाणा येथील रहिवासी असलेले एका व्यक्तीच्या मोबाईलवर लसीकरण यशस्वी झाल्याचा मेसेज आला. नंबर लावूनही सजना सजना मिळणारे लसीकरण एवढ्या सहजच पणे यशस्वी झाल्याचा मेसेज आल्यामुळे प्रथमतः तो मेसेज वाचल्यानंतर आनंदाचे वातावरण निर्माण झाले परंतु ज्या व्यक्तीला लसीकरण झाल्याचे सांगण्यात आले होते. ती व्यक्ती तीन वर्षापूर्वीच स्वर्गवाशी झाली होती त्यामुळे आपल्या वडिलांना लसीकरण झालेच कसे या प्रश्नाने डोके सुन्न झाले मात्र आपल्या वडिलांच्या नावावर कोणी तरी बोगस लसीकरण केले का? कोरोणाचा धसका घेतलेल्या वैद्यकीय प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी मयत झालेल्यांना सुद्धा लसीकरण सुरू केले आहे की काय असे त्या नातेवाईकांना वाटले त्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर असे समजले की चुकून रजिस्ट्रेशन झाले आहे परंतु रजिस्ट्रेशन करतांना आधार नंबर व पॅन नंबर आवश्यक असते. 
  त्यामुळे माझ्या मयत वडिलांच्या नावावर लसीकरण झालेच कसे याची चौकशी झाली नाही तर मात्र मी रीतसर तक्रार दाखल करणार असल्याचे त्या मयत व्यक्तीच्या मुलाने आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (राहुरी- तालुका प्रतिनिधी )📲7350591600
close