shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रहारच्या मदतीने मिळाला जातीचा दाखला..!!


शिर्डी प्रतिनिधी :
कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील सुनील लक्ष्मण आहेर यास प्रहार संघटनेच्या मदतीने जातीचा दाखला मिळाला असून, नुकताच प्रहारचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. 


या वेळी शिंदे यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदशनाखाली सुनील लक्ष्मण आहेर यास जातीचा दाखला काढणे करिता खूप अडचणी येत होत्या. त्यामुळे आहेर यांनी माझी भेट घेत दाखला मिळविण्यासंबधी मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर मी तत्काळ दखल घेत प्रांत ऑफिसला पाठपुरावा केला व सुनील लक्ष्मण आहेर यांस जातीचा दाखला मिळवून दिला. 

या प्रसंगी कार्याध्यक्ष संजय शिंदे, तालुका सघंटक नितीन तिपायले, कृष्णा भिंगारे, ज्ञानेश्वर शेळके, सुनील आहेर, संजय कावाडे आदी प्रहारसेवक उपस्थित होते. सुनील आहेर यांनी अहमदनगर उत्तरचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे व सर्व प्रहार पदाधिकाऱ्याचे आभार मानले.
close