हिंगोली। प्रतिनीधी:
दि.२२,अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती,ब्रिक्स ह्युमन राईट मिशनच्या वतीने समितीच्या वर्धापन दिनानिमित्त व मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त दि.१७ सप्टेंबर शुक्रवार रोजी स्वातंत्र्य सैनिक व पदाधिकाऱ्यांचा सत्कार संभारभ कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमात पत्रकार विश्वनाथ देशमुख तथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे हिंगोली जिल्हा प्रसिध्दीप्रमुख यांना राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील(बाबा) खंडापुरकर यांच्या हस्ते कोरोना योध्दा पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती,ब्रिक्स ह्युमन राईट मिशनच्या वतीने लातुर येथील प्रणवश्री मंगलकार्यालयात वर्धापनदिनानिमित्त व मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांचा व पदाधिकाऱ्यांचा तसेच कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणार्या डॉक्टरा,नर्स,पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच पत्रकारांचा कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी देशातील विविध भागातील पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.यावेळी पत्रकार तथा समितीचे हिंगोली जिल्हा प्रसिध्दीप्रमुख विश्वनाथ देशमुख यांचा पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील(बाबा)खंडापुरकर यांनी कोरोना योध्दा पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरव केला.
यावेळी ब्रिक्स ह्युमन राईट मिशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा डाँ.कविताताई रायजादा,राष्ट्रीय सरचिटणीस अमोल नानजकर,राष्ट्रीय सरचिटणीस गिरीराज महिराश,राष्ट्रीय प्रवक्तया संपादक सुनिताताई कसबे,राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य पृथ्विराजसिंह प्रदीप पाटील खंडापुरकर,विधी विभागाचे प्रदेश अध्यक्ष अँड.विजय पवार,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा अँड.राणीताई स्वामी,राणीताई आहेर,आय.टी.सेलचे प्रदेशाध्यक्ष संतोष ठाकरे,पुजाताई निचळे,मराठवाडा विभागीय अध्यक्ष पंडीत तिडके,हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष रमेश कुटे,शंकरराव देशमुख आदीसह देशातील विविध राज्यातुन आलेले महिला पदाधिकारी व पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

