shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लाडेगाव प्रकरणी सर्व दलित संघटनाचे दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या बॅनरखाली..!!

आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू..!!  



तहसीलदाररांची व स्वाभिमानी रिपाइंचे मनोजभाई संसारे यांची उपोषण स्थळी भेट 


-----------------------------------------------------



प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-                          

केज तालुक्यातील लाडेगाव येथील गायरान प्रकरणा वरून तालुक्यातील सर्व दलित पक्ष व संघटना आक्रमक झाल्या असून दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या बॅनरखाली एकत्र येऊन दि. २१ सप्टेंबर मंगळवार रोजी सर्वपक्षीय आमरण उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा दुसरा दिवस अस्तनाहीं कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने उपोषण सुरूच आहे.




लाडेगाव ता. केज येथील गायरान प्रकरणा वरून सर्व दलित संघटना व पक्ष एकत्र आले आहेत. दि. २१ सप्टेंबर मंगळवार रोजी ११:३० वा. केज तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसले आहेत. दि २२ सप्टेंबर रोजी उपोषणाचा दुसरा दिवस असताना कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे उपोषण सुरूच आहे. 


उपोषणार्थींच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत. युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप दहिफळे व बिट जमादार डोईफोडे यांना निलंबित करावे. दलित समाजातील अतिक्रमण धारकांना विरोध करण्यासाठी या गायरान जमिनीवर राबविण्यात येणार असलेले वनीकरण आणि नियोजित सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्यात यावा. गायरान जमिनितील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावे. गायरान जमिनीशी अर्था-अर्थी काही एक संबंध नसणारे सवर्ण समाजातील गावगुंड हे दलित समाजावर अन्याय करीत असताना व त्यांच्या गुन्हे दाखल असतानाही प्रशासन कार्यवाही करीत नसल्याने दलित वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच दलित समाज हा गुन्हेगारी प्रवर्गातील नाही तरी आकसापोटी त्यांच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल केले गेले आहेत. त्यामुळे प्रशासनाने सामाजिक सलोखा व ऐक्य अबाधित ठेण्याचा प्रयत्न करावा. या मागण्यासाठी दोन दिवसां पासून केज तहसील कार्यालया समोर उपोषणाला बसले आहेत. मात्र अद्यापही ठोस आश्वासन मिळालेले नसून लोकप्रतिनिधींनी उपोषणाकडे पाठ फिरवली असल्याने दलित कार्यकर्त्यांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे.




---------------------------------------



उपोषणाला दलीत कार्यकर्त्यांच्या भेटी :-


उपोषणाला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते मनोजभाई संसारे, मराठवाडा अध्यक्ष विजयदादा साळवे, वंचित आघाडी युवा बीड जिल्हाध्यक्ष निलेश साखरे. वंचित आघाडीचे भगवंत वायबसे, शैलेश कांबळे, मानवहीत पक्षाचे बाबासाहेब शिंदे, गौरी शिंदे, सिताताई बनसोड, यांनी भेट दिली.


---------------------------------------------------------



रिपाईंच्या शिष्टमंडळाची निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट :-


लाडेगाव प्रकरणी आज दि. २२ सप्टेंबर रोजी युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली


बीड जिल्हा सचिव राजू जोगदंड, जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन वाघमारे, बीडचे तालुका अध्यक्ष किसन तांगडे, केज तालुका अध्यक्ष दिपकभाऊ कांबळे, शहराध्यक्ष भास्कर भाऊ मस्के, दिलीप बनसोडे यांनी निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन गायनधारकवर दाखल केलेले भा.दं.वि. ३०७ व ३९५ चे खोटे गुन्हे रद्द करून न्याय देण्याची मागणीचे निवेदन दिले. 


close