shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धोकेदायक झालेले गावची वेस व तलाव प्राधान्याने दुरुस्त करा.. इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाने केली मागणी

धोकेदायक झालेले गावची वेस व तलाव प्राधान्याने दुरुस्त करा.. इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाने केली मागणी .
 इंदापूर प्रतिनिधी: (१४ सप्टेंबर २०२१)    ऐतिहासिक वास्तू असलेले इंदापूर शहराची वेस व तलावाचे १४ ऑक्टोबर २०२० पावसात प्रचंड नुकसान झाले. या दोन्ही वास्तू इंदापूर च्या इतिहासाच्या साक्षीदार आहेत ह्या दुरुस्तीचे काम लवकर करण्यासाठी आज काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी राजाराम कापरे यांची भेट घेतली.
    तलावावरून गेलेला रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे व धोकेदायक बनलेला आहे. तसेच इंदापूर शहरातील वेशीचे सुद्धा पडझड झालेली आहे. दोन्ही ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते व व अपघात होण्याची शक्यता आहे. मागील एक वर्षांमध्ये शहरात विकासासाठी निधी आलेला आहे परंतु ह्या दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. तरी धोकेदायक झालेला तलाव व गावची वेस प्राधान्याने दुरुस्त करा अशी मागणी काँग्रेस पक्षांनी केली.
  यावेळी चर्चेसाठी इंदापूर नगरपालिकेचे विरोधीपक्षनेते पोपट शिंदे ही उपस्थित होते
        तसेच इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील सावंत, शहराध्यक्ष चमन भाई  बागवान, किसान काँग्रेस सेलचे अध्यक्ष डॉक्टर संतोष होगले, जिल्हा सरचिटणीस जकिर भाई काजी, इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, सरचिटणीस निवास शेळके, राहुल वीर, सचिव महादेव लोंढे, शहर उपाध्यक्ष तुषार चिंचकर  आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
close