shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटना अस्लम रसुल शेख यांची इंदापुर तालुका अध्यक्षपदी निवड.

महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटना अस्लम रसुल शेख   यांची इंदापुर तालुका अध्यक्षपदी  निवड.

     इंदापूर प्रतिनिधी:  पुणे येथे महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेच्या इंदापुर तालुका अध्यक्षपदी अस्लम रसुल शेख यांची निवड  नदीम भाई मुजावर संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट यांच्या हस्ते(१३ सप्टेंबर २०२१) रोजी करण्यात आली. 
     वडापुरी येथिल  समाजसेवक असलम शेख हे एक अपंग व्यक्तिमत्व असुन ते एक प्रसिद्ध कव्वाल आहेत. नेहमी सामाजिक कार्यामध्ये  अग्रेसर असल्याने त्यांच्या सामाजिक कार्याची व सामाजिक जन जागृतीची  संघटनेच्या वतीने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ति करण्यात आली. 
    तसेच भविष्यात संघटनेच्या माध्यमातून समाजाची सेवा करावी व तसेच संघटनेच्या माध्यमातून गोरगरीबांना सहकार्य करुन समाजाचे विविध समस्याचे निवारण करावे व संघटन बळकट करावे असे संघटनेच्या वतीने त्याना सांगण्यात आले. व तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. 
     संघटनेच्या वतीने एक अपंग व्यक्तिला काम करण्याची संधी देण्यात आल्यामुळे समाजास चांगला संदेश दिलेला आहे. यामुळे मुस्लिम फ्रंट  संघटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
      यावेळी नदीम भाई मुजावर संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट, फारुख वकील सल्लागार, मुस्तफ़ा कपाड़िया सल्लागार, कदीर भाई शेख कोअर कमीटी सदस्य आदी  उपस्थित होते.
close