भंडारदरा ;- आज दि. 13 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 9=00 वा. भंडारदरा धरणात एकूण 11039 द.ल.घ.फुट(100%) इतका पाणीसाठा असून भंडारदरा धरणातून 12104 क्युसेक्स इतका पाणी विसर्ग सोडण्यात आला आहे.
निळवंडे धरणात सायं. (9=00वा.) वाजेपर्यंत सुमारे 7876 द.ल.घ.फुट म्हणजेच 94.58% टक्के इतका पाणीसाठा झाला असून सद्यस्थितीत निळवंडे धरणातून प्रवरा नदी मध्ये एकूण16101 क्युसेक्सने पाणी विसर्ग सोडण्यात आलेला आहे.
सततच्या मुसळधार पावसामुळे हा विसर्ग 20 ते 25 हजारांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. तरी कृपया नदीकाठी असलेल्या सर्व गावांतील नागरीकांनी, शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी. अशी विनंती कार्यकारी अभियंता,उर्ध्व प्रवरा धरण विभाग, संगमनेर प्रशासनाने केली आहे.

