shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आरोग्य भरती परीक्षा स्थगित करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास खर्चाची नुकसान भरपाई देण्यात यावी किंवा जेव्हा परीक्षा असेल तेव्हा प्रवासात सुट द्यावी- म.न.से...!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतिनिधी दिपक हरिश्चंद्रे.

राहुरी:राज्यामध्ये दिनांक 25 ते 26  सप्टेंबर 2021 रोजी आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया राबवली होती. पण रात्री नऊ वाजता आरोग्यमंत्री निर्णय दिला की भरती प्रक्रिया रद्द झालेले आहे.

तसेच काही मुलांच्या हॉल तिकीट मध्ये  गोंधळ आढळून आल्यामुळे भरती प्रक्रिया रद्द झाली.तरी विद्यार्थ्यांनी या प्रवासाकरिता  चार दिवसाचे पासेस काढले होते. तसेच एसटी महामंडळांनी त्यांना नुकसान भरपाई द्यावी किंवा  सदर परीक्षा ज्यावेळेस राबवण्यात येईल त्यावेळेस त्यांना परीक्षा कालावधीमध्ये प्रवास सूट देण्यात यावी अशा  प्रकारची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कडून  करण्यात आली आहे. त्यासंबंधीचे निवेदन मनसे उपजिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण , व मनसे शहराध्यक्ष प्रतिक विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली व मनवीसे तालुकाध्यक्ष सागर माने यांच्या  नेतृत्वाखाली राहुरी बस स्थानक  प्रमुखांना  निवेदन देण्यात आले की  आरोग्य भरती परीक्षा स्थगित करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास खर्चाची नुकसान भरपाई  किंवा जेव्हा परीक्षा असेल तेव्हा प्रवासात सुट देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या  वतीने  करण्यात आली.

          त्याप्रसंगी मनसे उपजिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण , मनसे शहराध्यक्ष प्रतिक विधाते , विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष सागर माने , उपतालुकाध्यक्ष गणेश शेडगे , मनवीसे शहराध्यक्ष प्रसाद गुंजाळ ,महेश घाडगे , मनवीसे उपतालुकाध्यक्ष नवनाथ शेडगे ,राजू आधगळे ,अमोल खुरपे आदी मनसैनिक उपस्तिथ होते.

Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे,(राहुरी- तालुका प्रतिनिधी )📲7350591600

close