shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महात्मा फुले कृषी विद्यापीठाची धूरा आता या नवनियुक्त दोन अधिकाऱ्यांवर..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतिनिधी दिपक हरिश्चंद्रे.

राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी कृषी विभागाचे प्रमोद लहाळे तसेच नियंत्रकपदी सुखदेव बलमे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी नियंत्रक विजय कोते यांची बदली झाल्यामुळे व रिक्त असलेल्या कुलसचिवपदी नवे अधिकारी रूजू झाले आहेत. विद्यापीठाची कार्यपद्धती व शासन स्तरावर समन्वय साधण्यासाठी शासनाच्या या दोन अधिकाऱ्यांची मोठी भूमिका असते.
  तसेच दहा जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांसाठी व विद्यार्थ्यांसाठी कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार कार्याची भूमिका, महात्मा फुले कृषी विद्यापीठासह अनेक संशोधन केंद्रे, विभागीय विस्तार केंद्रे कार्यरत आहेत. 
तसेच शासकीय व खासगी महाविद्यालयांमध्ये विद्यापीठाची खालावलेली कामगिरी, घसरलेले मानांकन, पन्नास टक्क्यापेक्षा जास्त रिक्त जागा, शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांची कार्यक्षमता, त्यामध्ये पाच दिवसांचा आठवडा, विद्यापीठांच्या दहाही जिल्ह्यांमध्ये वाढलेले अतिक्रमण, विद्यापीठातील अंतर्गत राजकारण, सातव्या वेतन आयोगाबाबत अंमलबजावणी, वेतन देयकाबाबत प्राध्यापकांचे प्रलंबित विषय, कोविड पार्श्वभूमीवर शासनाकडून कमी येणारा निधी, विद्यापीठामध्ये वाढलेले कंत्राटीकरण अशा अनेक समस्यांना सामोरे जावून कृषी विद्यापीठ कसे पुढे नेता येईल व मागील काही वर्षांमध्ये खालावलेली कामगिरी कशी सुधारता येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे,(राहुरी- तालुका प्रतिनिधी )📲7350591600


close