*मावा व्यवसायिक तेजीत आणि अन्न व औषध प्रशासन सध्या कोमात..!
*अन्न व औषध प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची होतेय नागरिकांकडून खमंग चर्चा..!!
प्रतिनिधी । मोहन शेगर :-
सोनई :- नेवासा तालुक्यातील सोनई, घोडेगाव, वडाळा, चांदा, गंगथडी, पट्टयातील सर्व मोठी गावे त्याच प्रमाणे नेवासा तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेली गावे या ठिकाणी सर्रास पणे खुलेआम पणे मावा ,गुटखाा, सुगंधी तंबाखुची विक्री होत असताना अन्न औषध प्रशासन अस्तिवात आहे कि नाही असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या धंद्यात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असताना गेल्या सहा महिन्यांपासून एकदाही यावर कारवाई झालेली नाही. हे खाते सध्या करते काय..? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे किंवा याला कुणाचा छुपा राजाश्रय आहे का..? ? या विभागाकडुन व पोलीस यंत्रणे कडुन किरकोळ व ठोक विक्रेते यांच्या वर कारवाई केली होती. यानंतर हा व्यवसाय छुप्या पद्धतीने सुरू होता. आडोशाला कुठेतरी मावा मळणयाचे व चोळणयाचे काम चालायचे. बांधलेल्या पुडयांची चोरुन विक्री केली जात होती.
मात्र अलीकडच्या काळात हा व्यवसाय राजरोस पणे सुरू असताना एकदाही मोठी कारवाई होताना दिसत नाहीं. शासनाने मावा गुटखा सुगंधी तबाखु यांवर बंदी घातली आहे. तरीही मावा, गुटखा व सुगंधी तंबाखु यांची विक्री कुणाच्या आशिर्वादाने खुलेआम पणे सुरू आहे. सरकारने फक्त कागदोपत्रीच गुटखाबंदी केली, सरकारने आदेश काढले तरी त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.अनेक तरुण पिढी व्यसनाधिन होण्यापासुन रोखायचे असल्यास याची अंमलबजावणी कठोरपणे होणे गरजेचे आहे.
घातक पदार्थदाचे मिश्रण.
या परिसरात मावा स्पेशल म्हणून काही पान टपरया प्रसिद्ध आहेत. हे व्यवसायिक सध्या भाडोत्री खोलीत मध्यरात्री यंत्राद्वारे सदर गोष्टी तयार करुन वेगवेगळ्या ठिकाणी हा माल लपवून ठेवला जातो.
विक्री साठी स्वतंत्र यंत्रणा राबविली जात आहे, शरिराला अत्यंत घातक व विषारी असणारे घटक त्यात टाकले जातात. आता जिल्हा अधिकारी व अन्न भेसळ प्रतिबंधक विभाग पोलीस यंत्रणा यांनी संयुक्तपणे कारवाई करावी अशी मागणी सर्व गावातील ग्रामस्थांमधुन व नागरिकांकडून केली जात आहे.
आता तरी अन्न व औषध प्रशासन या बातमीची दखल घेणार की मुख गिळून गप्प बसणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

