shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रोजगाराच्या संधी व राष्ट्रीय एकात्मता हीच हिन्दी भाषेची शक्ति...डॉ.रमेश शिन्दे..!!

प्रकाश मुंडे| बीड जिल्हा प्रतिनिधी :-

अॉन लाईन चर्चा सञाला मराठवाड्यातील प्राध्यापकांनी दिला भरघोस प्रतिसाद दिला. 

केज येथील बाबुरावजी आडसकर महाविद्यालयात हिन्दी दिवस संपन्न झाला.मध्यकाळापासून आजतागायत विविधतेत ऐक्य जपण्याबरोबरच रोजी रोटी व सामान्यांचा श्वास म्हणून हिन्दी भाषेची ओळख आहे. 


जागतिकीकरणाच्या घोडदौडीमध्ये जाहीरातीच्या रूपाने हिन्दीचे वारू जगभर उधळत आहेत ,त्यामुळे हिन्दी ही जगातल्या इतर भाषेपेक्षा सर्वात वेगाने वाढत असलेली भाषा ठरत आहे. असे प्रतिपादन बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज येथील आभासी व्याख्यानात  यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अम्बाजोगाई येथील हिन्दी विभाग प्रमुख डॉ. रमेशराव शिन्दे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य फावड़े होते. बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाच्या हिन्दी  विभागातील सहयोगी  प्रा .डॉ.प्रकाश खुळे यांनी राजभाषा हिन्दी दिनाचे महत्व व परंपरा तसेच घटनात्मक तरतुदी व सद्यस्थिति यावर प्रकाश टाकला.




मध्ययुगीन  संतांचे भारत भ्रमण त्यांनी केलेले साहित्यातले उदबोधन हे हिन्दी भाषेस संजीवनी ठरले.यात संत कबीर रोहिदास नामदेव इत्यादि प्रमुख संतांनी सहज सोप्या हिन्दी भाषेतून सदाचाराची शिकवण दिली.मुगल व ब्रिटिश काळातही हिन्दी भाषेची भरभराट झाली. आज जागतिकीकरणामध्ये तर हिन्दी भाषा रोजगाराची व जाहिरातीची  मुख्य भाषा बनत आहे. सिनेमा टीवी रेडियो या माध्यमांनी साहित्यापेक्षा हिन्दीचा प्रचार प्रसार केलेला आहे.

             

या आभासी कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील डॉ.गायकवाड,डॉ.राऊत, डॉ.भंडे डॉ.हिरवे डॉ.सोळंके ,डॉ.बिडवे डॉ. सोळंके व इतर सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एम.जी.फावडे हे होते तर सूत्रसंचलन वसुन्धरा महाविद्यालयातील हिन्दी विभागाचे प्रा.डॉ. सवने यांनी केले तर आभार प्रदर्शन बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातील डाॅ.राऊत एस.आर. यांनी केले.

close