*वेळोवेळी निवेदन देऊनही कारवाई होत नाही..!
श्रीरामपूर । प्रतिनिधी :
महाराष्ट्र नवनिर्माण सेने श्रीरामपूरच्या वतीने गेल्या पाच सहा महिन्यापासून विविध विषय घेऊन प्रांत अधिकारी यांना वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला तरी देखील कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांचे नेतृत्वाखाली दिनांक 30/९/ 2019 रोजी श्रीरामपूर येथील प्रांत कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले.
मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी धरणे आंदोलन चालू केल्यानंतर प्रांत अधिकारी यांची मिटींग चालू असल्याचे सांगितल्याने मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उग्र आंदोलन चालू केले व जोर जोरात प्रांताधिकारी मुर्दाबाद, प्रांताधिकार्यांना करायचं काय, खाली डोकं वर पाय ,अवैध बांधकाम करणारे वाळू चोर, अवैधपणे चालणारे दगड खाण व मुरूम उत्खनन करणाऱ्या चोरांना पाठीशी घालणाऱ्या प्रांत अधिकाऱ्यांची त्वरित हकालपट्टी करा...; अधिकाऱ्यांचा धिक्कार असो अशा विविध घोषणांनी प्रांत कार्यालय दणाणून सोडण्यात आले.
शासकीय कार्यालयातील अधिकारी घटनास्थळी आले. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले की आम्ही गेल्या पाच सहा महिन्यापासून विनंतीपूर्वक प्रांत अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून सांगितले की कशा पद्धतीने गोदावरी व प्रवरा नदीतून वाळूची चोरी चालू आहे तसेच कुठलीही परवानगी नसताना खुलेआमपणे वीट भट्टी दगड मुरूम उत्खनन चालू आहे, तसेच मोठ्या प्रमाणात बांधकामे आहेत व काही भागांमध्ये नव्याने सुरू झालेल्या परवानगी नसताना व बिगर शेती येणे नसताना शाळेचे मोठ्या प्रमाणात बांधकाम करून व सीबीएससी पॅटर्न ची कोणतीही परवानगी नसताना विद्यार्थ्यांची पालकांची फसवणूक व आर्थिक लूट करण्याचे काम काही लोक करत आहेत.
या सर्व विषयांचे पुरावे सादर करून देखील कुठल्याही प्रकारची दखल घेऊन संबंधितांवर प्रांत अधिकारी यांनी कारवाई न केल्याने व प्रांताधिकारी या लोकांना प्रोत्साहन देतात कि काय? या मागचे गोड बंगाल कायआहे? संबंधितांवर कारवाई न करणार्या अधिकार्यांनी झोपेचे सोंग घेतलेल्या प्रांत अधीकार्यांना जागे करण्यासाठी आज त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे.
या आंदोलनाची दखल घेऊन संबंधित दोषींवर कारवाई न झाल्यास पुढील आठवड्यात रस्ता रोको करून चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. वेळप्रसंगी बिनकामाचे प्रांत कार्यालयास टाळे ही ठोकण्यात येईल, तसेच नुकतेच हरेगाव, उंदिरगाव येथील हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान असणारे पुरातन मारुती मंदिर पाडणाऱ्या व पिंपळाचे पुरातन झाड तोडणार्या लोकांवर देखील त्वरित कारवाई करण्यात यावी व दोषींना लवकरात लवकर शासन करण्यात यावे. असे बाबासाहेब शिंदे, मनसे जिल्हाध्यक्ष हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले.
तहसीलदार प्रशांत पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन सांगितले की प्रांत अधिकाऱ्यांची मिटिंग चालू असल्याने त्यांनी आपले निवेदन स्वीकारण्यास सांगितले व संबंधित लोकांवर आठ दिवसात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. असे आश्वासन तहसीलदार यांनी दिल्याने आंदोलन कर्त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात धरणे आंदोलन स्थगित केले.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी मनसे जिल्हा सचिव तुषार बोबडे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, विधानसभा अध्यक्ष डॉक्टर संजय नवथर, तालुका अध्यक्ष गणेश दिवसे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष विशाल शिरसाट, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष विकी राऊत,विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अक्षय सूर्यवंशी, कामगार सेना तालुका अध्यक्ष मनोज जाधव, भास्कर सरोदे निलेश सोनवणे अमोल साबणे संदीप विशंभर विष्णू अमोलिक अतुल तारडे लखन कडवे,गोरक्षनाथ येळे, विकी शिंदे नितीन खरे अमोल जाधव सतीश कुलकर्णी, राहुल शिंदे, निकेतन रोकडे, बाबासाहेब भालेराव, संकेत शेलार, गौरव कुमावत, लखन शिंदे सुरज भोसले प्रशांत गायकवाड मोहन शेजुळ, आकाश शिंदे, प्रसाद नागळ, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

