shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रशासनाच्या नाकावर टिच्चून बेकायदेशीरपणे मांगुर उत्पादनाचा राजरोसपणे हैदोस


प्रतिनिधी:  सुर्यकांत होनप

     इंदापूर: दि. ३०  /   इंदापूर तालुक्यातील कालठण नं.1 येथे राजरोसपणे मांगुर संवर्धन चालू असून, प्रशासनाची कोणतीही भीती राहिलेली नाही. मागच्यावेळी नागरिकांनी आवाज उठवल्यावर व काही वृत्तपत्राने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर मत्स्य विभागाने कारवाई केली व  साठा नष्ट करण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली .त्यानंतर एक ते दीड महिना होऊन गेला तरी अजून देखील फौजदारी कारवाई केली गेली नाही. यावरून असे वाटते आहे मत्स्य विभागातील अधिकारी व मांगुर संवर्धकांची आर्थिक हितसंबंध असावेत.

  मांगूर  संवर्धकांना साठा विक्री करण्यास अवधी मिळावा म्हणून अधिकारी उशीर करत आहेत अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. संबंधित अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर प्रत्येक वेळी नवीन  तक्रार अर्ज द्या असे सांगितले जाते व प्रत्येक वेळी मांगूर संवर्धकांना येऊन नोटीस दिले जातात. त्यानंतर मांगुर संवर्धक पटापट मांगुर ची विक्री करून टाकतात. त्यामुळे पुढच्या कारवाईच्या वेळी तलाव रिकामे असलेला रिपोर्ट दिला जातो.  परंतु प्रत्येक वेळी कारवाई करून देखील मांगुर संपूर्णपणे बंद का होत नाही याचे उत्तर नागरिकांना मिळत नाही..

    मांगूर संदर्भात कारवाई करताना अधिकाऱ्यांकडून वेळखाऊ पणा केला जातो व अधिकारीच पळवाटा शोधत आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते किसनराव जावळे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस चे कालठण गावातील  तालुका पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली लवकरच मोठं जनआंदोलन उभारणार आहोत असे युवानेते गोविंद पाडुळे यांनी सांगितले.
close