वडापुरी , झगडेवाडी व वरकुटे खुर्द गावात स्वच्छता महाश्रमदान दिन निमित्त स्वच्छता.
इंदापूर प्रतिनिधी: (१६ सप्टेंबर २०२१)पुणे जिल्हा परिषदेने दिनांक १६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात स्वच्छता महाश्रमदान दिन आयोजित केला आहे. त्यानुसार इंदापूर तालुक्यातील ११६ ग्रामपंचायती व प्रत्येक गावात हा उपक्रम राबवून परिसर स्वच्छ केला जात असून त्यानुसार सुरुवात आज इंदापूर तालुक्यातील वडापुरी , झगडेवाडी व वरकुटे खुर्द गावात करण्यात आले.
या वेळी वडापुरी गावचे उपसरपंच विठ्ठल कदम, ग्राम विकास अधिकारी शिवाजी फुगे, सुनिल पिंगळे, विलास खामगळ , स्वप्नील बंडगर, जगन्नाथ बंडगर, ग्रामपंचायत कर्मचारी संजय ठोंबरे, दादा चंदनशिवे, नारायण पवार इत्यादी उपस्थित होते.
तसेच झगडेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच सौ रुपाली अतुल झगडे विद्युत वितरण समितीचे तालुकाध्यक्ष अतुल झगडे, उपसरपंच यशोधा राजगुरू, सदस्य विद्याताई झगडे, जालिंदर बोराटे, संतोष राजगुरू, ग्रामसेवक एल के जगताप, मुख्यद्यापक मोरे मॅडम,लोंढे सर व गावातील ग्रामस्थांनी या अभियानात सहभाग घेतला.
यावेळी सरपंच रूपाली झगडे म्हणाले की सर्व गावांमध्ये एकाचवेळी सामुदायिक श्रमदान, शोषखड्डा निर्मिती,भिंतींवर स्वच्छताविषयक घोषवाक्य, सार्वजनिक ठिकाणच्या भिंतीवर स्वच्छते विषयीचे संदेश लिहिणे, शाळा-अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा करणे, सार्वजनिक शौचालयांची रंगरंगोटी करणे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित करणे इत्यादी कार्यक्रम हाती घेण्यात आले असून झगडेवाडी गाव स्वच्छ करण्याच्या उद्देशाने गावातील नागरिकांनी हातात झाडू घेतला आहे. तसेच पुणे परिषदेत झगडेवाडी गाव आदर्श कसे ठरेल यासाठी ग्रामपंचायत व सर्वच नागरिक या अभियानात सहभागी झाले आहेत.
वरकुटे खुर्द येथे ग्रामपंचायत संरपंच बापुराव शेंडे, उपसरपंच सौ पुष्पाताई विजय शेंडे, सदस्या सौ बानुबाई शहाजी दगडे, सदस्य सचिन मारुती मासाळ, सदस्य संतोष मोरे , सदस्य विलास शेंडे ग्रामस्थ व ग्रामसेवक विठ्ठल मरगळ व पथमिक शाळेचं शिक्षक,शिक्षिका उपस्थित होते .

