शिर्डी । प्रतिनिधी :-
प्रदेश तेली समाज महासंघ महाराष्ट्र राज्य व अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा यांचे वतीने मा श्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा श्री विजय चौधरी , प्रदेशाध्यक्ष, सौ संध्याताई सव्वालाखे प्रदेशाध्यक्षा महिला आघाडी , श्री विजय संकपाळ प्रदेशाध्यक्ष युवक आघाडी , श्री ॲड.डॉ विक्रांत वाघचौरे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी पोलीस स्टेशन शिर्डी येथे भारताचे पंतप्रधान तेली समाज भूषण मा श्री नरेंद्र जी मोदी साहेब यांच्या विषयी सोशल मीडियावर जातीवाचक व्यंगचित्र व तेली समाजाचे तेलघाणा बदनामी केली, जातीवाचक विधान केले , व जातीवाचक अपशब्द वापरल्याबद्दल कारवाही करण्याबाबत तक्रार अर्ज व जाहीर निवेदन शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब श्री गुलाबराव पाटील साहेब यांचे वतीने ठाणे अंमलदार श्री मोरे साहेब यांना दि 30/09/2021 रोजी देण्यात आले.
सदर तक्रारी नुसार गणेश आ वानखेडे ,वर्धा, धंदा :- व्यंगचित्रकार,मोबाईल क्रमांक 9921746849.व प्रा नितेश कराळे , धंदा - शिक्षक रा वर्धा, मोबाईल क्रमांक 8010285625, या सामनेवाले विरुद्ध लेखी तक्रार दाखल करून केली. सदर आरोपी यांनी मंगळवार दिनांक 28/09/2021 रोजी त्यांच्या फेसबुक अकाऊंट वर तेली समाजाचे मानचिन्ह असलेला तेल घाणा ज्यास तेली समाजात अत्यंत पवित्र मानले जाते. जे श्री भगवान शंकर यांचे प्रतीक आहे, व तेली समाजास पूजनीय आहे,अश्या तेल घाण्यास अनुसरून व्यंगचित्र काढून त्यावर जातीवाचक शब्दाचा वापर करून सामाजिक माध्यमावर प्रसारित करून तेली समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, तसेच भारताचे माननीय पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदी जे तेली समाजाचे भूषण आहे तसेच देशाचे पंतप्रधान आहे, अश्या पदसिद्ध व्यक्ती बाबत त्याच्याच जाती वरून जातीवाचक विधान करून तेली समाजात व इतर समाजात तेढ निर्माण केला,अश्या बेजबाबदार कृत्याचे समर्थन करणे देखील कायद्याने गुन्हाच आहे.
प्रसार माध्यमांचा चुकीचा गैरवापर करून केवळ प्रसिद्धीसाठी गैरवापर करून धार्मिक भावना दुखावून , सामाजिक तेढ निर्माण करणे, तसेच तेली समाजाचा विषयी अपशब्द वापरल्यामुळे सामनेवाले गैरअर्जदार यांचे विरुद्ध अट्रोसिटी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा व गुन्ह्याची लवकरात लवकर चौकशी होऊन योग्य ती कारवाही व्हावी अशा आशयाचे तक्रार अर्ज तथा जाहीर निवेदन देण्यात आले व गुन्हा नोंद करण्यात यावा ही विनंती समाजाचे वतीने केली आहे.यावेळी जिल्हा कोअर कमिटी सदस्य श्री यशवंतराव वाघचौरे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष ॲड.विक्रांत वाघचौरे, जिल्हा निरीक्षक श्री बद्रीनाथ लोखंडे, जिल्हा सह प्रसिद्धी प्रमुख श्री शशिकांत महाले, शिर्डी शहर तेली समाज बांधव श्री दीपक चौधरी, श्री सिद्धेश्वर नाना वाघचौरे, श्री सूरज काळे आदी समाज बांधवांच्या स्वाक्षरीने दाखल करण्यात आला.
यावेळी यावर लवकरात लवकर गुन्हा नोंद होईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक साहेब शिर्डी श्री गुलाबराव पाटील साहेब यांनी दूरध्वनी वर चर्चा करून सांगितले.

