सतीश वैजापूरकर
शिर्डी । ता.२२।९।२१
करायला गेलो गणपती आणि झाला मारूती.
पुढच्यास ठेच मागचा शहाणा.
या दोन म्हणींचा प्रत्यय काल साईसंस्थान मध्ये आला.
काल रात्री उशीरा साईसंस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप व अन्य पाच जणांना पोलीसांनी अटक केली.
साई संस्थानचा कारभार पहाणा-या तदर्थ समितीचे अध्यक्ष व जिल्हा प्रधान न्यायधिश हे एका सदस्यांसह साईमंदिराची पहाणी करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडीयावर व्हायरल केल्याने हि कारवाई करण्यात आली. या प्रकरणाची साईमंदिर सुरक्षाप्रमुख हर्षवर्धन गवळी यांनी चौकशी करून अहवाल सादर केला.
त्यानुसार प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, सीसीटीव्ही विभागप्रमुख विनोद कोते, राहूल फुंदे, अजित जगताप, सचिन गव्हाणे व चेतक साबळे यांच्यावर हि कारवाई करण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव साईमंदिरातील सीसीटीव्ही फुटेज बाहेर द्यायला परवानगी नाही.साईसंस्थानने तसा ठराव केला आहे, साईमंदिर सध्या दर्शनासाठी बंद आहे.मग हे फोटो व फुटेज व्हायरल केले कुणी, यामागे न्यायधिशांची रेकी करण्याचा हेतू तर नव्हता, बदनामी करण्याचा हेतू तर नव्हता.साईमंदिर सुरक्षा व्यवस्थेशी हि बाब निगडीत आहे, त्यामुळे याप्रकरणाची चौकशी व्हावी.अशी तक्रार माहीतीच्या अधिकारातील कार्यकर्ते संजय काळे यांनी तदर्थ समितीच्या अध्यक्षांकडे केली.त्यानंतर पोलीस निरीक्षक गवळी यांनी चौकशी करून अहवाल तयार केला.त्यानुसार हि कारवाई करण्यात आली.
संजय काळे यांच्या म्हणण्यानुसार साईमंदिर दर्शनासाठी बंद असताना मंदिरात काही बदल करण्यात आले.
त्याची पहाणी करण्यासाठी तदर्थ समिती सदस्य व आणखी एक सदस्य साईमंदिरात गेले असता हा प्रकार घडला.आता हे बदल करणे कितपत योग्य, त्यासाठी परवानगी घेतली होती का ?आणखी एक वेगळा मुद्दा या प्रकरणात पुढे येणार आहे.
साईमंदिरातील बदल व साईमंदिर सुरक्षा ऑडीट करण्याची मागणी संजय काळे यांनी केली असून त्यानंतर या सर्व प्रकरणाचा सुत्रधार नेमकाकोण आहे, हे लवकरच स्पष्ट होईल. तसे झाले तर, करायला गेले गणपती आणि झाला मारूती या म्हणीची प्रचिती येईल.
असो, नव्या विश्वस्त मंडळाला काल पहिल्याच घासाला खडा लागला.सरकारी पक्षाने मंडळाची यादि उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात सादर केली नाही.
त्यामुळे हा घोळ झाला. दोन दिवसांकरीता त्यांचे अधिकार गोठविण्यात आले.
नव्या मंडळात सामाजिक व अर्थिक दुर्बल घटक प्रतिनीधी नाही, आठ पैकी केवळ पाच तज्ञ नेमले त्यातही विवीध क्षेत्रांना प्राधान्य न देता, तिन अभियंते व दोन वकील आहेत. नगर जिल्ह्यातील सात विश्वस्त नेमायचे तर त्यातील दोन नियुक्त्या जिल्हाबाहेरी करण्यात आल्या. सतरा पैकी अकराच नियुक्त्या झाल्या, कोरम पूर्ण व्हायला अडचणी येतील.आणि सर्वात शेवटी या मंडळातील सदस्यांवर कुठले गून्हे तर दाखल नाहीत ना? या सर्व आक्षेपांना या मंडळाला तोंड द्यावे लाागेल.
यापूर्वी तिन मंडळे राज्य सरकारच्या बेफीकीरीनेकेलेल्या नियुक्त्यांमुळे अकाली गेली.आता हिच बेफीकीरी या चौथ्या मंडळाची वाट तर लावणार नाही ना ?
याचे उत्तर मिळविण्यासाठी थोडी वाट पहावी लागेल.
पुढच्यास ठेस मागचा शहाणा या म्हणीकडे सरकारने दुर्लक्ष केले.त्याचा हा परिणाम...
स्नेहांकीत
सतीश वैजापूरकर

