shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हिटरमधुन पाणी घेताना सोनईत विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू ..! माहेरच्या कडुन घातापाताचा संशय.;सासरच्या दारात अंत्यसंस्कार..!!


प्रतिनिधी ।  मोहन शेगर 
सोनई :-नेवासा तालुक्यातील सोन,ई येथील गणेशवाडी रस्त्यावरील दरदले वस्ती येधील राहत्या घरात हिटर मधुन पाणी घेतांना विजेचा शाक बसल्याने विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोन,ई येथील गणेशवाडी रस्त्यांवरील दरदले वस्ती येथे घडली. 

सोनई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे माहेरच्या लोकांनी घटने बाबद संशय व्यक्त केला सासरचय दारातच अंत्यविधी करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे या घटने बाबद पोलीस सुत्रां कडुन समजलेली अधिक माहिती अशी की रविवार दिनांक १९ रोजी राहत्या घरात विजेच्या हिटर मधुन पाणी घेतांना पुजा प्रविण दरदले ( वय२७) हीस शाक बसला तिला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यु झाला सिव्हिल हॉस्पिटलच्या खबरी नुसार सोन,ई पोलीसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ५१/२०२१ सी आर पी सी १७४ नुसार अकस्मात मृत्यूची नोंद केली मयत पुजाचे वडील गंगाधर वाघाडे रा घोडेगाव ता नेवासा व नातेवाईकांनी रागांचा भरात दरदले यांच्या दारासमोर पुजाचा अंत्यविधी केला सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र करपे व पथकाने येथे बंदोबस्त ठेवल्याने मोठा अनर्थ टळला माहेरी कडील वाघाडे कुटुंब व नातेवाईकांनी मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन सासू सासरे व पती वर संशय असल्याचे सांगितले या बाबत सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र करपे यांना विचारले असता पी एम रिपोर्ट आजुन आलेला नाही.

 माहेरच्या लोकांना पोलीस ठाण्यात बोलविले आहे त्यांनी फिर्याद दिली तर गुन्हा दाखल केला जाईल असे समजते मयत पुजा हिस दोन लहान मुले असल्याचे सांगण्यात येते अकस्मात मृत्यूचा तपास सोन,ई पोलीस करीत आहेत.
close