नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के):
नगर तालुक्यातील शेंडी येथील इण्डियन ओवरसीज बैंकच्या शाखेवर दरोडा पडल्याचा ग्रामसुक्षा यंत्रणेच्या माध्यमातून शेंडी येथील पाचशे नागरीकांना एकाच वेळी इण्डियन बैंकच्या शाखेवर दरोडा पडला असा संदेश आला.पाच मिनिटांच्या कालावधीत या गावातील चारशे ते पाचशे नागरीक बॅंके जवळ जमा झाले. त्या पाठोपाठ एम आयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी आपल्या ताफ्यासह दाखल झाले.पोलिसा कडुन संबंधित दरोडेखोरांना माईक द्वारे आव्हान करण्यात येऊ लागले आपणास संपूर्ण बाजुंनी घेरावा घातला आहे.
आपण पोलिसांना शरण यावे.
असे वारंणवार आव्हान केले.दरोडेखोरांना आपण पुर्ण पणे घेरलो गेलो आहे, हे लक्षात आल्याने त्यांनी शरणागती पत्कराण्याचे धोरण ठरवले बंदुकाधरी पोलिस बॅंक शटर जवळ दबा धरून बसलेले होते, दरोडेखोर हत्यार बंद असल्याने खबरदारी घेतली जात होती.दरोडेखोर बाहेर पडताच पोलिसानी झडप घालून तांब्यात घेतले. हा सर्व थरारा नागरीका आपल्या मोबाईल मध्ये कैद करत होते. तर काही नागरीक पोलिसांना मदत करत होते. हा दरोडा ग्रामसुरक्षा यंत्रणाचा रंगीत तालीम प्रकार आहे, असे पोलिस प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
नंतर गावकऱ्यांनी नि सुटकेचा श्वास सोडला ग्रामसुक्षा यंत्रणेच्या माध्यमातून एकाच फोनवर कसे काम केले जाते हि रंगीत तालीम जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हि रंगीत तालीम पार पाडण्यात आली,
शेंडी गावातील गावकऱ्यांनी अनभुवला बँक दरोडा समाज माध्यमांवर उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे...
या यंत्राणेची ताकत व महत्व कळण्यासाठी जिल्हा मधील हे दुसरे प्रात्यक्षिक होते. पहिला डेमो कोठेवाडी येथे घेण्यात आला होता. आज दुसरा डिमो शेंडी गावातील इण्डियन ओवरसीज बैंकच्या शाखेत घेण्यात आला, नागरिकांनी या यंत्रणेचा आपत्कालीन परिस्थितीत वापर नक्की करावा.
पो.नि.अनिल कटके (गुन्हे अन्वेषण विभाग अ.नगर)
पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम सुरक्षा यंत्रणा ताकद आणि महत्व कळण्यासाठी आज शेंडी येथे दरोडा प्रात्यक्षिक घेतले. एम आयडीसी पोलिसांच्या मदतीने हे प्रत्याक्षिक घेतले हि यंत्रणा किती पावरफुल आहे. हे समजण्यासाठी हे प्रत्याक्षीक आयोजन केले होते.तरी नागरिकांना या योजनेचा वापर जबाबदारी व काळजीपूर्वक वापर करावा.
ग्रामसुक्षयंत्रणेचा टोल फ्री क्रमांक 18002403600
डि.के गोडेॅ
(ग्राम सुरक्षा यंत्रणा संचालक)

