अहमदनगर दि. 2 :- टपाल जीवन विमा योजना व ग्रामीण टपाल जीवन विमा योजने अंतर्गत असणा-या विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी विमा प्रतिनिधींची नेमणूक वरिष्ठ अधीक्षक डाकघर, अहमदनगर विभाग, अहमदनगर यांचे मार्फत थेट नियुक्ती केली जाणार आहे. नमूद केलेल्या अटींची पूर्तता असणा-या उमेदवारांनी वरिष्ठ अधीक्षक डाकघर, अहमदनगर विभाग, अहमदनगर यांच्या कार्यालयास दिनांक 13 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत मुलाखतीस उपस्थित रहावे.
उमेदवार हा 12 वी पास असणे आवश्यक आहे. त्याची वयोमर्यादा 18 ते 60 असणे आवश्यक आहे. उमेदवार हा कोणत्याही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी, माजी जीवन सल्लागार, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, स्वयंसेवी संघटना चालक, माजी सैनिक, निवृत्त शिक्षक, बेरोजगार, स्वयेरोजगार असणारे तरुण किंवा तरुणी वरील पात्रता असणारे इच्छुक उमेदवार मुलाखतीस उपस्थित राहू शकतात. इच्छुक उमेदवारांनी विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची पूर्णत: माहिती असणे अपेक्षित आहे. उमेदवारावर कोणताही गुन्हा, खटला दाखल नसावा. उमेदवाराची निवड 12 च्या गुणांवर तसेच उच्च शैक्षणिक पात्रता व मुलाखतीत मिळालेल्या गुणावर केली जाईल.
मुलाखतीस येताना उमेदवाराने आवश्यक कागद पत्रे- जन्म तारखेचा दाखला, शैक्षणिक पात्रता, आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक, ई मेल आय डी व इतर आवश्यक कागद पत्रे तसेच या क्षेत्रातील अनुभव असल्यास त्या बाबतची कागद पत्रे घेऊन यावीत. असे वरिष्ठ अधीक्षक डाकघर , अहमदनगर विभाग अहमदनगर यांनी कळविले आहे.


