जनता महाविद्यालयाला नॅक तफॅ"बी' ग्रेड प्राप्त...
नगर प्रतिनिधी:- (शिवा म्हस्के)
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे रुईछत्तीशी येथील जनता कला व विज्ञान महाविद्यालयाने अल्पावधीत राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाण समितीतर्फे आपले मूल्यांकन करून घेतले आणि बी ग्रेड (सीजीपीए 2.37) प्राप्त केला ही बाब प्रशंसनीय आहे. या साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरेश बाबर यांचे योगदान महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सचिव जी डी खानदेशे यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयास नॅक समिती मूल्यांकनतून 'बी ग्रेड" प्राप्त झाल्याबद्दल या कामे योगदान देणाऱ्या महाविद्यालयातील सर्व घटका समवेत सहयोग देणाऱ्या व्यक्तींच्या उपस्थित जनता कला व विज्ञान महाविद्यालयात आनंदोत्सव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून श्री खानदेशे बोलत होते.
यावेळी संस्थेचे खजिनदार मुकेशदादा मुळे , जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरेश बाबर, महाविद्यालयाचे आय क्यू ए सी चे समन्वयक प्रा रविराज सुपेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र भापकर, ग्रामपंचायत चे माजी सरपंच श्रीकांत जगदाळे ,उपसरपंच विशाल भांबरे, मठपिंप्रिचे सरपंच हौसराज नवसुपे, पत्रकार शिवा म्हस्के, पत्रकार देविदास गोरे. पत्रकार संजय ठोंबरे,
वाळुंज चे उपसरपंच अनिल मोरे , बनपिंपरी चे सरपंच भाऊसाहेब पठारे ,उपसरपंच सुभाष पठारे ,वडगाव तांदळी चे उपसरपंच अश्विनी रणसिंग, तांदळी चे उपसरपंच वैभव
मुनफन , तांदळीचे चेअरमन गोकुळ घिगे, मेजर सोमनाथ जगदाळे, माजी पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण दरंदले , ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ गोरे, शिवसेना युवा तालुका अध्यक्ष प्रवीण गोरे, शरद गोरे, दीपक गोरे ,दत्तात्रय पवार ,निलेश गोरे ,लक्ष्मण खाकाळ ,दत्तात्रय मुटकुळे ,रमेश भामरे, संजय भामरे, राम साबळे , , दिलीप गांगर्डे, रावसाहेब साबळे , बाबासाहेब पाडळकर रामराव गोरे ,माजी प्राचार्य बी व्ही नागवडे, उपप्राचार्य डॉ डी एस तळुले, विभाग प्रमुख प्रा जगताप सर, देवळाली प्रवराच्या प्राचार्य श्रीमती हापसे, वाल्मिकी नागवडे, जनता उच्च माध्यामिक विद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग गोरे, दता नारळे महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक सचिन पुरी, प्रविणकुमार नागवडे, निलेश जासुद, नरवडे सर, नितीन निपुगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरेश बाबर यांनी महाविद्यालयाचे मूल्यांकन मूल्यांकन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्व घटक आणि प्रदीप कृतज्ञता व्यक्त करत या कामात सहयोग आणि मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांच्या प्रति आभार व्यक्त केले . महाविद्यालयास मिळालेले यश केवळ माझ्या एकट्याची नसून त्यासाठी सर्व महाविद्यालयीन शिक्षक-शिक्षकेतर टीमचे महत्वाचे योगदान योगदान आहे. या सर्व टीमचे अथक प्रयत्न यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युथ नॅशनल चॅम्पियनशीप मध्ये दोनसे मिटर धावने या क्रिडा प्रकारात राष्ट्रीय पातळीवरील सुर्वण पदक प्राप्त झाल्या बदल विकास सायंबर या खेळाडूचा प्रमुख मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून विभीषण सपाटे यांनी आपले मनोगत व्यक्त करत रुई छत्तिशी येथे महाविद्यालय सुरू केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले व अल्पावधीत महाविद्यालयाने केलेल्या प्रगतीचे कौतुक केले.
संस्थेचे खजिनदार मुकेश दादा मुळे यांनी आपल्या भाषणातून महाविद्यालयास मिळालेल्या यशा बद्दल अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..
ग्रामीण भागात महाविद्यालय सुरू करून परिसरातील मुलींच्या उच्च शिक्षणाची सोय करण्यासाठी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेची कार्य मोलाचे असून ग्रामीण भागात सर्व सोयींनी युक्त कॉलेज सुरु केल्यामुळे मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे . तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाचे महत्व असून या ठिकाणी सुसज्ज जिमखाण्याची व्यवस्था व्हावी असे मत जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. राजेंद्र गोरे यांनी केले तर आभार समन्वयक प्रा रविराज सुपेकर यांनी व्यक्त केले.




