shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूरमध्ये भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन.

इंदापूरमध्ये भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन.
   आपल्या विविध मागण्यांसाठी सरकारला शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिले लेखी निवेदन.
   
      

इंदापूर प्रतिनिधी:(८ सप्टेंबर २०२१)    इंदापूर 
तालुका भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाबा चौक ते पंचायत समिती पर्यंत घोषणा देत येथील पंचायत समितीच्या आवारामध्ये धरणे आंदोलन करून सरकारला आपल्या विविध मागण्यांचे लेखी निवेदन दिले आहे.
   पुणे जिल्हा भाजपा शिक्षक आघाडीचे अध्यक्ष संतोष कदम, नगरसेवक कैलास कदम आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे आणि इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
     भाजप शिक्षक आघाडी महाराष्ट्र, दि. ८ सप्टेंबर रोजी आपल्या विविध मागण्यासाठी राज्यभर आंदोलन करीत आहे. खालील मागण्या पूर्ण होण्याकरिता आज इंदापूर भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. 
  या निवेदनात पुढील मागण्या केल्या आहेत. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत,वरिष्ठ व निवड श्रेणी च्या प्रशिक्षणाच्या तारखा तात्काळ घोषित करणेबाबत,१ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशतः अनुदानित शाळांमध्ये नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे बंद केलेले  भविष्य निर्वाह निधीचे खाते तात्काळ सुरू करण्याबाबत, एक तारखेला वेतन  मिळण्याबाबत व वेतनास विलंब करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याबाबत,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम व वैद्यकीय प्रतिपूर्ती ची रक्कम तात्काळ देय करण्याबाबत, परिविक्षाधीन सहाय्यक शिक्षक (शिक्षण सेवक) परिविक्षाधीन शिक्षकेत्तर कर्मचारी (शिक्षकेत्तर सेवक) यांचे मानधन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वाढविण्याबाबत, शिक्षक भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करणे बाबत, शिक्षकांना व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना त्री- स्तरीय १० , २०, ३० आश्र्वासित प्रगती योजना तात्काळ लागू करण्याबाबत,घोषित ,अघोषित व मूल्यांकनास पात्र तुकड्या, शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्याची प्रत्यक्ष कार्यवाही करण्याबाबत,रात्र शाळेतील कर्मचाऱ्यांना १७ मे २०१७ च्या शासन निर्णयानुसार पूर्णकालिन कर्मचाऱ्यांप्रमाणे  सर्व प्रकारचे लाभ मिळण्याबाबत, इतर स्थानिक विषय
   वरीप्रमाणे सर्व मागण्या या अतिशय रास्त असून तात्काळ पुर्ण कराव्या यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, शालेय राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, शालेय शिक्षण विभागाचे अप्पर सचिव वंदना कृष्णा यांना लेखी निवेदन दिले आहे.
   यावेळी शंकर हुबाले, अंबादास कांबळे, रमेश कुलकर्णी, संताराम ढावरे, अण्णासाहेब खटके, रघुनाथ पन्हाळकर, अर्जुन भोंग,दादा चौधरी, शंकर गुळीक, शशिकांत गायकवाड, यशवंत केवारे, बाळासाहेब गटकुळ व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
close