shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"खडांबे खुर्द" येथे काल बैलं पोळा तर आज ट्रॅक्टर पोळा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात साजरा..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.

राहुरी:  तालुक्यातील " खडांबे खुर्द" गावामध्ये पोळा हा सण  अर्थातच शेतकऱ्यांची आणि कष्ट करणाऱ्या मुक्या प्राण्यांची दिवाळी आहे असं मानल तर काही वावगं ठरणार  नाही.
    
आज मानवाने कितीही प्रगती केली तंत्रज्ञनाद्वारे यंत्र सामुग्री अवगत केली तरी देखील शेतकर्यांसाठी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांसाठी बैलांना मोठ्या प्रमाणावर महत्व होते आणि आहे देखिल. आपल्या  खांद्याला खांदा लाऊन दिवसभर उन्हातान्हात राब- राब राबणाऱ्या बैलांप्रती कृज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा हा सण. 
       
   
महाराष्ट्रातील अनेक भागात पोळा हा सण साजरा केला जातो या दिवशी पिठारी आमवस्या असते आणि श्रावण महिन्याचा श्रावणी सोमवारचा शेटवचा दिवस म्हणजे पोळा; या  सणाला शेतकरी वर्गामध्ये अनन्य साधारण असे महत्व आहे. शेतकरी कितीही अर्थिक अडचणीत असला तरी देखील आपल्या सोबत वर्षभर कष्ट करून मोत्यांप्रमाणे अन्नधान्य पिकविणाऱ्या मुक्या प्राण्यांला आपल्या शेतात आपल्या बरोबरीने राबणाऱ्या आपल्या बरोबर कष्ट करणार्यां  बैलांना आपआपल्या आर्थिक परिस्थतीनुसार साज त्यामध्ये प्रामुख्याने नविन वेसण, पायात पैजण, गळ्यात कवड्यांची माळ, गोगर, घाटी (घंटा),अंगावर चादर, शिंगाला बेगड, शेंबी, असे एक ना अनेक वस्तू पोळ्याला खरेदी करतो. अंगावर रंग रंगोटी करतो परंतु गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांचा शेती मालाला भाव, नैसर्गिक संकट आणि कोरोना महामारिमुळे आर्थिक संकटात सापडला आहे त्याचा परिणाम काहीसा न कळत दिसून आला.


        
पोळ्याच्या आधल्या दिवशी हळद लावतात त्याला मळवट भरणे असेही म्हणतात त्या दिवशीपासून भरपूर आणि चांगल्या प्रकारचा चारा देतात. पोळ्याच्या दिवशी सकाळीच लवकर उठून बैलांना साबण लावून स्वच्छ धुवून काढले जाते, दिवसभर मोकळ्या शेतात चरू देतात 
    
  
मग दुपारपासून लगबग सुरु होते ती  बैलं सजावटीची साधारण दोन- तीन तास बैलं सजावटीचे काम चालते. साजवट कोणाच्या बैलाची कशी होते या मध्ये जणू काय स्पर्धाच लागलेली असते. 
       
 "खडांबे खुर्द" येथे काल बैलं पोळा सण असाच  काहीसा होता, शेतकऱ्याने  साजवट केलेली बैलं जोड आपआपल्या वस्ती वरून जुने  गावठाण येथील हनुमान मंदिर या ठिकाणी आणून  पारंपरिक  वाद्याच्या मिरवणुकीत बैलं जोड जूने गाव हनुमान मंदीराला वेडा मारून गोल फिरवत दर्शन घेतले जाते. साधारण एका जागेवर आर्धा तास ठेवली जातात गावातली  सगळी बैलं जमल्यावर गावातील जुन्या परंपरे प्रमाणे खडांबे खुर्द येथील  "कल्हापूरे" पाटलांचा मान असल्यामुळे त्यांची बैलं जोड आधी गावच्या वेशितून जाणार मग इतर सगळ्यांचे तो पर्यंत कोणीही दुसरी कुनाची बैलंजोड आधी न्यायची नाही असा काहीसा नियम असतो.  नंतर डी. जे. आणि पारंपारिक वाद्याच्या मिरवणुकीत गावातली प्रमुख देवस्थान विठ्ठल मंदीर, बिरोबा मंदीर, आणि नविन गावातील मारुती मंदीर येथून आपल्या वस्ती वर नेली गेली. 



  
तसेच खडांबे खुर्द गावा प्रमाणेच तालुक्यातील  वांबोरी,कत्रड,गुंजाळे,धामोरी,वरवंडी,बाभूळगाव,सड़े, उंबरे आदि पांच्कृशित  देखिल बैलपोळा दिमाखात साजरा केला गेला.

     
बळीराजाच्या आनंदाचा कृषी संस्कृतितील बैलांच्या योगदानाचे ऋण व्यक्त करणारा सण म्हणजेच बैल पोळा. बैलांच्या खुराने शेती केली की, घरात खोऱ्याने समृद्धी येते, असं मानणारा शेतकरी बांधव आणि सगळ्यांनी साथ सोडली, तरी वाळलेला कडबा गोड मानून मालकाच्या सोबत स्वतःही शेतात राबणारे बैल, यांच्यातील नात्याला खरंच तोड नाही.

     
'कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला' पर्याय नाही, हजारो वर्षांपासून आपल्यासाठी राबणाऱ्या बैलाचा व बळीवंशीयांचा आवडता सण म्हणजे पोळा. वर्षभर खांद्याला खांदा लावून आपल्या मालकासोबत शेतीत घामाच्या धारा वाहून सोनं पिकवणाऱ्या सर्जा-राजाचा आजचा दिवस पोळा हा सण आहे.
  भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. आपल्या देशात विविध जाती धर्माचे लोक एकजुटीने राहतात. विविध सण, उत्सव अगदी आनंदाने साजरे केले जातात. माणसाच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी जवळपास 70% लोक शेती करतात. ज्यांच्यावर संपूर्ण जग अवलंबून असते. अशा शेतकर्‍यांचा सण पोळा आहे. तमाम सर्व शेतकरी बंधूंना खुप खुप शुभेच्छा. "इडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे" 

     आता पाहुयात "खडांबे खुर्द" येथील ट्रॅक्टर पोळा कश्या पद्धतीने साजरा केला आहे.


               
गेल्या काही वर्षंपासून तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण झाल्याने इतर क्षेत्रात जशी दिवसेंदिवस प्रगती झाली तसेच शेती क्षेत्रात हि झालीच लवकरात-लवकर शेतीची कामे होण्याकरिता बैलां एवजी अनेक शेतकरी हल्ली ट्रॅक्टर वापरतात  म्हणूनच पोळा सणाला जसे शेतकरी आपल्या बैलं जोडीला  सजावट करतो त्या प्रमाणे आपले ट्रॅक्टर देखिल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी धुवून सजावट करुण खडांबे खुर्द येथील बाजार तळ या ठिकाणी  अंदाजे ५०-५५ ट्रॅक्टर  एका रांगेत रिबीन‌‌ आणि  फुगे लाऊन  आणले आणि संपुर्ण गावातून रॅली काढून रेल्वे स्टेशन येथील जगदंबा माता मंदीर,बिरोबा, मंदीर, मारुती मंदीर आणि शेवटी लक्ष्मीवाडी येथील गणपति मंदीर या ठिकाणी आणून तेथेच या मिरवुकीचा  शेवट करण्यात आला.
       
खडांबे खुर्द येथे ट्रॅक्टर पोळा साजरा करण्याचे हे पाचवे वर्ष असुन पाउस आल्याने या मिरवूनुकीच्या आनंदावर काहिस विरजनही पडले खडांबे खुर्द गावा प्रमाणेच  राहुरी तालु्यातील इतरही अनेक गावामध्ये शेतकरी ट्रॅक्टर पोळा मोठ्या दिमाखात साजर करतात.

Shirdi Express Live#(राहुरी-तालुका प्रतिनिधी) बातम्या🗞️ आणि जाहिराती करीता संपर्क @दिपक हरिश्चंद्रे , खडांबे 📲7350591600.
close