संगमनेर । प्रतिनिधी (ऋषिकेश जगताप):-
संगमनेर डेपो मध्ये एक धक्कादायक घटना घडली.
बस चालकाची गळफास घेऊन बस मध्ये आत्महत्या केली आहे.या चालकाने पाथर्डी-नाशिक या बस मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असून ही घटना मंगळवार दिनांक २१-९-२१ रोजी सकाळी ६ च्या दरम्यान उघडकीस आली.
सुभाष तेलोरे, राहणार पाथर्डी असे या चालकाचे नाव आहे. तेलोरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असल्याचे बोलले जाते.त्याच बसमधील वाहकाच्या म्हणण्यानुसार त्यांच्या चेहऱ्यावर तणावाचा लवलेशही दिसत नव्हता परंतु त्यांनी असा पाऊल का उचलला हे अद्यापही कोणाला कळले नाही.
पाथर्डी- नाशिक डेपो ही बस प्रवास करीत होती. त्यावेळेस बसमधील डिझेल संपले तेव्हा बस संगमनेर डेपो मध्ये आली व संगमनेर डेपो मध्ये सुद्धा डिझेल शिल्लक नसल्याने त्यांना रात्रीचा मुक्काम तिथेच करावा लागला. सकाळी ६ वाजता त्याच बसमधील वाहक यांनी त्यांना गळफासाला लटकलेले बघितले. व ही घटना उघडकीस आली.
पुढील तपास संगमनेर पोलिस ठाण्यातील पोलीस निरीक्षक, मुकुंद देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

