हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि१९,अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती,ब्रिक्स ह्यूमन राईट मिशनच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वर्धापनदिनानिमित्त दि.१७ सप्टेंबर शुक्रवार रोजी स्वातंत्र्य सैनिक व पदाधिका-यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये कोरोना योद्धा सन्मानपत्र राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या हस्ते हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील तथा मराठवाडा विभागीय अध्यक्ष पंडित तिडके यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्यात आला आहे.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवं ब्रिक्स ह्युमन राईट मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळा दि.१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्रामदिनानित्त लातूर येथील प्रणवश्री मंगल कार्यालयात पार पडला. कोरोना संकटामध्ये संपूर्ण जग एकजुटीने लढत आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये डॉक्टर्स,नर्स,पोलीस कर्मचारी ,समाजसेवक यांनी कोरोना योद्धा म्हणून आपल्या जीवाची पर्वा न करता अनमोल असे कार्य केले.याकाळात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष पंडीत तिडके यांनी जिवाची पर्वा न करता सर्वसामान्य जनतेसाठी काम केले.
कोरोना काळात देशवासीयांसाठी जे समाजकार्य केले,त्यांची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे.या अनमोल आत्यंतिक तळमळीच्या कार्यासाठी पंडीत तिडके यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ब्रिक्स ह्युमन राईट मिशनचे राष्ट्रीय अध्यक्षा महिला डॉ.कविता रायजादाजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्यूमन राईट मिशनच्या संयुक्त विद्यमाने कोरोना योद्धा सन्मानपत्र देण्यात आले.या प्रसंगी राष्ट्रीय सरचिटणीस अमोल नानजकर,राष्ट्रीय समन्वयक गिरीराज महिराश,राष्ट्रीय प्रवक्ता सुनीताताई कसबे, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य पृथ्वीराजसिंह प्रदीप पाटील खंडापूरकर,विधी विभागाचे प्रदेश अध्यक्ष अँड.विजय पवार,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा अँड.राणीताई स्वामी, आय.टी.सेलचे प्रदेशाध्यक्ष संतोषजी ठाकरे,सर्व दाधिकार्यांच्या वतीने कोरोना योद्धा सन्मान पत्र देण्यात आले.


