shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुका काँग्रेस आयोजित केलेल्या संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभार्थी नोंदणी कार्यक्रामात २५० नागरिकांची नोंदणी.

इंदापूर तालुका काँग्रेस आयोजित केलेल्या संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभार्थी नोंदणी कार्यक्रामात २५० नागरिकांची नोंदणी.
इंदापूर प्रतिनिधी: (२१ सप्टेंबर २०२१)संजय गांधी निराधार योजना अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत बिजवडी पंचक्रोशीतील परितक्ता,अपंग बंधू-भगिनी व ५९ वर्षे वयावरील निराधार वृद्धांचा लाभार्थी नोंदणी कार्यक्रम इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील सावंत व संजय गांधी योजना नायब तहसीलदार प्रियंका वैकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी( दि.२१ )रोजी पार पडला.
इंदापूर काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या लाभार्थी नोंदणी कार्यक्रमात 250 नागरिकांनी विविध योजनांच्या लाभासाठी आपले  अर्ज दाखल केले.संजय गांधी निराधार योजना इंदापूर कार्यकारणी चे सदस्य महादेव लोंढे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संजय गांधी निराधार योजना इंदापूर कार्यकारणी चे सदस्य आबासाहेब निंबाळकर,सरपंच दादाराम काळेल,उपसरपंच प्रियंका पारेकर,ग्रामसेवक अशोक शेळके, आकाश पवार,श्रीनिवास पाटील,राहुल वीर,इंदापूर काँग्रेस शहराध्यक्ष चमनभाई बागवान,पुणे जिल्हा सरचिटणीस जाकिरभाई काझी,युवराज गायकवाड आदी उपस्थित होते.


 
इंदापूर काँग्रेस तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत म्हणाले की,हा कार्यक्रम आम्ही आयोजन करून सरकारी यंत्रणा आपल्या दारापर्यंत आणली आहे. संजय गांधी निराधार योजना अंतर्गत शासनाच्या विविध योजना असून या योजनेची माहिती सर्वसामान्य गरजूवंत नागरिकांना व्हावी हा या कार्यक्रमातील प्रमुख उद्देश असून शासनाचे या योजनांसाठी जे निकष आहेत ते निकष आपणास माहिती व्हावेत आणि त्याचा लाभ आपणास घेता यावा हा प्रमुख उद्देश ठेवून इंदापूर काँग्रेसच्या माध्यमातून हा कार्यक्रम आज या ठिकाणी आवर्जून आयोजित केला.या कार्यक्रमासाठी विशेष करून इंदापूर संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य महादेव लोंढे यांनी खूप परिश्रम घेतले आहेत. आपण सर्व ग्रामस्थांनी या विविध योजना बद्दल माहिती जाणून घेऊन आवश्यक त्या निकषांसह आपले अर्ज आमच्याकडे द्यावेत जेणेकरून प्रत्येक महिन्याच्या मासिक बैठकीत आपले प्रस्ताव शासन दरबारी मांडून आपणास न्याय देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करु.


 
महादेव लोंढे म्हणाले की,शासनाच्या लाभापासून अनेक लोक वंचित आहेत.या सर्वांपर्यंत शासनाच्या योजना पोहचल्या पाहिजेत यासाठी मागील दोन दिवसापूर्वी पक्षाने निर्णय केला.त्यानुसार मी ज्या गावी राहतो त्याच गावापासून याची सुरवात केली.काही एजंट मंडळींकडून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत हजार दोन हजार घेऊन नागरिकांना गंडा घालून त्यांची प्रकरणे केली जातात. वास्तविक या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक रुपयाही लाभार्थीला खर्च करावा लागत नाही.यास आळा घालण्यासाठी हा कार्यक्रम घेऊन थेट शासन आपल्या दारी आणून आम्ही शासनाच्या योजना आपणा पर्यंत पोहचवत आहोत. सदर नियोजित कार्यक्रम कोरोणाचे सर्व नियम पाळून पार पाडण्यात आला. या कार्यक्रमाचे आभार इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस निवास शेळके यांनी मानले.
close