आता जलपूजनासाठी पुढाऱ्यांची चढाओढ!!
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :- बीड-लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांची गेली चाळीस वर्षांपासून तहान भागवणारे मांजर धरण पूर्ण क्षमतेणे भरले आहे .आज धरणाचे दरवाजे उघडून धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती धरणाचे अभियंता पाटील यांनी दिली आहे .धरण 100%भरल्यामुळे पाण्याचा विसर्ग 1.27 द ल घ मी ने धरणाच्या उजव्या कालव्यातून चालू आहे .
मागील पाच वर्षात मांजरा धारण पूर्ण क्षमतेने भरण्याची ही दूसरी वेळ असून यावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे .
मांजरा धरणाकाटच्या शेतकऱ्यांना पिकांसाठी आवश्यकता भासल्यास धरणातून कालव्याद्वारे किंवा नदीपात्रातुन देखील पाणी सोडण्यास प्रशासनास कोणतीही अडचण निर्माण होणार नसल्याने बळीराजा देखील सुखावला आहे .
बीड जिल्ह्यातील प्रामुख्याने अंबाजोगाई , केज , धारूर या तालुक्यांना तर लातूर जिल्ह्यातील लातूर शहर आणि लातूर एम आय डी सी साठी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील नागरिकांची तहान मांजरा धारणाद्वारे मागविल्या जाते . मांजरा धारण पूर्ण भरल्यामुळे धरण परिसरातील विहिरी , जलकुंभ ,छोटे तलाव यांच्या पाणी पातळीमध्ये देखील वाड झाल्याचे दिसून येत आहे .यावरून शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे .


