shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

करुणा शर्मांना तारीख पे तारीख करत अखेर १६ व्या दिवशी जामिन मंजूर..!!

दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत परळी आणि अंबाजोगाई मध्ये येण्यावर बंदी..!! 

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-                     

कोर्टाच्या परंपरेला अनुसरून तारिख पे तारीख करून अखेर करुणा शर्मा आणि ड्रायव्हर अरुण मोरे यांच्या जामीन अर्जावर काल सोमवारी  अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही बाजूंना आपापली बाजू मांडण्याची संधी देऊन आणि त्यावर आज मंगळवारी  निकाल देताना न्यायमूर्तीनि  वैयक्तिक 25 हजाराच्या जातमुचलक्यावर (जामीन) आणि नगदी 5 हजार प्रत्येकी या अटींवर दोघांनचा जामीन मंजूर केला. आणि दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत बीड जिल्ह्यातील परळी आणि अंबाजोगाई मध्ये येण्यास बंदी घालण्यात आली.




बीडच्या परळीत प्राणघातक हल्ला आणि ॲट्रॉसिटी ऍक्टच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांच्या जामिनावर 20 सप्टेंबर रोजी सुनावणी झाली न्यायाधिश एस.एस.सापटनेकर यांच्यासमोर दोन्हीबाजूंनी युक्तिवाद झाला.करुणा शर्मा ह्या मागील पंधरा दिवसापासून बीडच्या न्यायालयीन कोठडीत आहेत.आज त्यांचा  कोठडीतील १६ वा दिवस होता.

अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात २० सप्टेंबर रोजी सुनावणी होऊन निकाल राखीव ठेवण्यात आला होता.वैयक्तिक 25 हजाराच्या जातमुचलक्यावर (जामीन) आणि नगदी 5 हजार प्रत्येकी या अटींवर दोघांनचा जामीन मंजूर केला. सशर्त जमीन देतांना दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत बीड जिल्ह्यातील परळी आणि अंबाजोगाईत येण्यास बंदी देखील घालण्यात आली. 

        

हा निकाल आज न्यायाधीश एस एस सापटनेकर यांनी दुपारी दिलाय. दरम्यान करुणा शर्मा यांना १५ दिवस न्यायालयीन कोठडीत राहावे लागले असून या निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.या प्रकरणात सरकारी वकील म्हणून ऍड अशोक कुलकर्णी यांनी काम पाहिले तर आरोपी करुणा शर्मा यांच्या वतीने ऍड भारजकार यांनी युक्तिवाद मांडला .दरम्यान न्यायालय आणि परिसरात पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता .

close