shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगरचे खराब रस्ते कधी दुरुस्त होणार . . ?

रस्त्यांतील खडड्यांमुळे होत आहे आरोग्यावर विपरीत परिणाम - अनुरिता झगडे

प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर : दि . २१ / आपण रोजच नगर मध्ये आजूबाजूच्या भागातून येत असतो जात असतो .नगर मध्ये पुणे रोड बायपास पासून सुरुवात केली तर चांदणी चौकापर्यंत तसेच एमजीरोड  कडे जाणारे रस्ते तिथून पुढे दिल्लीगेट सिविल हॉस्पिटल मनमाड रोड सगळीकडे रस्त्यांची अगदी दुर्दशा झाली आहे. आपण सगळे जण या रस्त्यांना नावं ठेवतो. व्यवस्थेला नावं ठेवतो. संबंधित विभागाला नावे ठेवतो. जेव्हा आपण त्या व्यवस्थेची संबंधित काम करतो तेव्हा किती लोक रस्त्यांकडे खूप प्रामाणिकपणे लक्ष देऊन रस्ते तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल कोणत्या प्रतीचा असतो हे पाहतात .

                 अनुरिता झगडे
      
सगळ्यांनी गांभीर्याने विचार करूयात. आमच्या सारख्या महिला 10 ते 15 कि. मी . रोज या रस्त्यावरुन बाईक चालवत असतात. आम्हाला घरची सुद्धा जबाबदारी पार पाडावी लागते. ऑफिसमध्ये सुद्धा काम करावे लागते. ऑफिसच्या वेळा पाळाव्या लागतात. बाईक वरील गाड्यांचे ब्रेक दाबून दाबून खड्ड्यांमुळे खरोखर आज आमची हाडे ठिसूळ बनली आहेत. काही महिलांना गर्भाशयाचे आजार सुरू झाले आहेत. तर काही महिलांना वर्टिगो सारखे प्रॉब्लेम सुरू झाले आहेत. कोण ऐकणार आमची व्यथा कोण देणारा आम्हाला न्याय. आहे का कोणाची मानसिक तयारी चला आपण आपल्या किमान प्रभागापुरते  तरी आपले रस्ते व्यवस्थित करूयात.   

चला आपण एक स्पर्धा घेऊयात या रविवारी जेवढ्यांना शक्य होईल तेवढ्या सर्व नागरिकांनी महिलांनी कॉलेज तरुणांनी किमान पाच किलोमीटर चा रस्ता खड्डे चुकून एक तासाच्या आत पूर्ण करायचा तोही धावत धावत....ज्येष्ठ नागरिकांनी म्हणजे 60 ते 70 फक्त छोटी बाईक चालवून दाखवायचे हे काम खूप सोपे आहे फक्त वीस मिनिटे गाडी खड्ड्यातून घेऊन जायचे जमेल का आपल्याला.... काय झाले ना आपण सगळे झोपलेल्या अवस्थेत आहोत कौटुंबिक कलह झाले की आपण तिकडे फक्त अनावश्यक नाक खूपसतो. जे सामाजिक प्रश्न आहेत, सार्वजनिक प्रश्न आहेत, आपल्याला पुरवण्यात येणाऱ्या सुविधांचे प्रश्न आहेत याकडे आपण अजिबात लक्ष देत नाही. 

मंडळींनो , सगळे एकत्र येऊयात आपल्यातला तिरस्कार द्वेष बाजूला ठेवूयात आणि आपलं नगर ज्याला ऐतिहासिक परंपरा आहे त्या शहरासाठी थोडावेळ देऊयात आणि नगरचा विकास राजकारण बाजूला ठेवून करूयात . आज अहमदनगर ची मुलगी पटकन कोणी पसंत करत नाही. अहमदनगर चा मुलगा ही सहजपणे नाकारला जातो याला कारण आपली सामाजिक व्यवस्था, राजकारण, भांडण, आपसातील हेवेदावे...   

                                                        अनुरिता झगडे                                            बारा बलुतेदार महासंघ अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष.
मानवाधिकार संघटना महिला संरक्षण समिती अहमदनगर जिल्हा अध्यक्ष.
8381007647
close