shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भिगवण येथील सौ. झुबेदा महेमुद मुलाणी यांना शिक्षक दिनानिमित्त पुणे जिल्हास्तरीय तंत्रस्नेही गुणवंत शिक्षक पुरस्कार .

भिगवण येथील सौ. झुबेदा महेमुद मुलाणी यांना शिक्षक दिनानिमित्त पुणे जिल्हास्तरीय तंत्रस्नेही गुणवंत शिक्षक पुरस्कार .

इंदापूर प्रतिनिधी: (७ सप्टेंबर २०२१)भिगवण येथील सौ. झुबेदा महेमुद मुलाणी यांना शिक्षक दिनानिमित्त शाहीर देवा कांबळे लोक कला मंच पुणे यांच्यावतीने पुणे जिल्हास्तरीय तंत्रस्नेही गुणवंत शिक्षक पुरस्कार राजगड ज्ञानपीठ भोरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्राध्यापक तात्याराव जेटीथोर यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. तात्याराव जेटीथोर होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुण्याचे अधिव्याख्याता सौ दिपाली जोगदंड ,आष्टा (बीड)चे गट शिक्षणाधिकारी सुधाकर यादव, विज्ञान अध्यापक संघ पुणे चे अध्यक्ष रोहिदास एकाड, शाहीर देवा कांबळे लोक कला मंचचे संस्थापक अध्यक्ष देवराव कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
सौ झुबेदा मुलाणी या गेल्या वीस वर्षापासून शिक्षक म्हणून कार्यरत असून सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवारवाडी पोंधवडी ता इंदापूर येथे कार्यरत आहेत. त्या दकश्राव्य माध्यमातून अध्यापन करतात. तसेच पावर पॉइंट प्रेझेंटेशन आणि ई-लर्निंग प्रोजेक्टर च्या साह्याने प्रभावी अध्यापन करतात. त्यांनी ज्ञानरचनावादावर आधारित कृतीयुक्त अध्यापनासाठी त्यांनी स्वतः तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याचा पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला व सांगली येथे राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांनी पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केले .कोरोना काळात त्यानी व्हिडिओ निर्माण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच ओसरी शाळेमार्फत मुलांना शिक्षण दिले

या यावेळी सौ झुबेदा मुलाणी म्हणाल्या की,
 पुरस्काराचे खरे मानकरी माझे विद्यार्थी आहेत असे सांगून यापुढेही विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून त्यांच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील .शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्याबद्दल शाहीर देवा कांबळे लोककला मंचाचे आभार त्यांनी व्यक्त केले.
close