shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विविध संस्थांच्या माध्यमातूनकेम येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर संपन्न.. !!

११० नागरिकांनी घेतला मोफत शिबिराचा लाभ

प्रतिनिधी : किसन कांबळे

केम : दि . ७ / "गरजवंतांना मदत करण्याची इच्छा जर प्रत्येक नागरिकांच्या मनात निर्माण झाली तर संपूर्ण देश प्रगतीच्या दिशेने जाऊन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही" .केम येथील सर्व ग्रामस्थांसाठी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा केम या ठिकाणी पीपल्स डेव्हलपमेंट फाउंडेशन , आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन , गयाबाई बहुउद्देशीय समाजसेवी संस्था करमाळा , बुधराणी हॉस्पिटल कोरेगाव पार्क पुणे , महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना करमाळा तालुका शाखा या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबिर मोतीबिंदू काचबिंदू मोफत ऑपरेशन शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते  त्यावेळी अध्यक्षीय भाषणात जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय अनिरुद्ध अण्णा कांबळे साहेब बोलत होते.

या शिबिराचा लाभ सुमारे 110 लोकांनी घेतला .तर सुमारे 14 जणांचे मोफत मोतीबिंदू काचबिंदू चे ऑपरेशन होणार आहे.

शिबिराचे उदघाटन केम गावचे सरपंच आकाश भोसले , अजित दादा तळेकर , पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य आदरणीय शेखर तात्या गाडे , शिवसेना तालुका आघाडीच्या अध्यक्षा वर्षाताई चव्हाण त्यांच्या सहकारी मोरे मॅडम यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

यावेळी पुढे बोलताना आदरणीय जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध अण्णा कांबळे यांनी सांगितले की समाजाच्या हितासाठी आम्ही केम कर नेहमी कटिबद्ध आहोत.ग्रामस्थांनी आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांनी कोणत्याही माझ्या नजरे पलीकडे नजर चुकीने राहिलेल्या विकासात्मक कामासाठी माझ्याशी थेट संपर्क साधला तर  मी ते काम करण्यासाठी बद्ध आहे.

केम या गावात असलेली वृद्धांची लोकसंख्या पाहता दृष्टीदोष निघण्याची शक्यता जास्त आहे म्हणून हे मोफत डोळे तपासणी शिबिर केम येथील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहे त्याचा लाभ सर्व ग्रामस्थांनी घेतला तर आमच्या प्रयत्नांना यश आले असे मी समजेल असे मत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्राध्यापक संजयकुमार राजेघोरपडे सर यांनी व्यक्त केले.

मागासवर्गीय शिक्षक संघटना ही समाजाचे काही देणे आहे म्हणून त्या समाजाची उतराई होण्याकरिता हे डोळे तपासणी शिबिर आम्ही आयोजित केले आहे याचा आम्हाला खूप आनंद होत आहे म्हणून ग्रामस्थांनी विशेषता युवकांनी आपल्या घरातील वृद्ध व्यक्तींना या शिबिरासाठी घेऊन यावे असे आवाहन मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा केम केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय महेश्वर कांबळे यांनी व्यक्त केले.

करमाळा तालुक्यातील विशेषता केम गणातील माझ्या बंधुंची आणि बघण्याची सेवा करणे तसेच त्यांना विविध आजारापासून मुक्त करणे या प्रकारचे आरोग्य शिबिरे राबवण्यासाठी डोळे तपासणी हा पहिला प्रयत्न आहे आणि जर केम येथील ग्रामस्थांनी याचा उपयोग करून घेतला तर मला प्रोत्साहन मिळेल म्हणून केम ग्रामस्थांना नम्र विनंती की आपण या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि माझं हे जे काम आहे त्या कामाला आपण प्रोत्साहन द्यावे असे मत पीपल्स डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ दीपक उर्फ नाना काकडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

खाजगी रुग्णालयामध्ये रुग्णांची होणारी विनाकारण आर्थिक लूट टाळण्यासाठी मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित करून गयाबाई बहुउद्देशीय समाज सेवा संस्था पीपल्स डेव्हलपमेंट फाउंडेशन आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन आणि बुधरानी हॉस्पिटल यांनी समाजासमोर नवीन उदाहरण प्रस्तुत केले आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही या सर्वांच्या पाठीमागे तन-मन-धनाने उभे राहू असे मत शिवसेना महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष आदरणीय वर्षाताई चव्हाण यांनी व्यक्त केले.

करमाळा तालुक्यातील सर्व गावांना आणि ग्रामस्थांना मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यासाठी आम्ही आपल्या मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने प्रयत्न करीत आहोत त्याचाच एक भाग म्हणून आज केम या मोठ्या गावांमध्ये शिबिर राबविण्याचा आनंद काही वेगळाच आहे या शिबिरासाठी क्षेम ग्रामस्थांनी ज्यांना केम गावचे सर्वेसर्वा मानले आहे असे आदरणीय अजित दादा तळेकर यांनी आम्हाला जे सहकार्य केले त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत अशी भावना मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष किसन कांबळे सर यांनी व्यक्त केली.

यावेळी केम गावचे सरपंच आकाश भोसले , केम गावातील ग्रामस्थांनी आपले मानलेले सर्वेसर्वा अजित दादा तळेकर, सागर भाऊ दोंड, गोरख दादा पारखे, बापू साहेब तळेकर, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा केम केंद्राचे केंद्रप्रमुख महेश्वर कांबळे सर, महेश तळेकर सर, अच्युत काका पाटील, संदिप तळेकर, सागर पवार, आदी प्रतिष्ठित उपस्थित होते.


 जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय अनिरुद्ध अण्णा कांबळे यांनी पीपल्स डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय ज्ञानदेव उर्फ दीपक काकडे , संचालक भैरवनाथ उघडे, संचालक राहुल रामदासी यांचे उपक्रम राबविल्याबद्दल कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


शिबीर संपन्न करण्यासाठी पीपल्स डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष ज्ञानदेव उर्फ दीपक काकडे ,भैरूनाथ उघडे, राहुल रामदासी शिबिरात बुधरानी हॉस्पिटल चे विभागीय अधिकारी मोहम्मद ठासरावाला, माया हजारे ,दिनेश जैन यांनी लोकांना चांगल्या प्रकारे सेवा दिली, त्याबद्दल लोकांनी त्यांचे कौतुक केले आहे. केंद्र शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक भाऊसाहेब तळेकर यांनी या शिबिरा करिता शाळा खोली उपलब्ध करून दिले तसेच येणाऱ्या लोकांना कोरोना पासून बचाव करण्याकरिता सोशल डिस्टंसिंग चे पालन करा तोंडाला मास्क वापरा आणि हात स्वच्छ धुवा यासारख्या त्रिसूत्रीचा प्रसार करीत होते.

या शिबिरामध्ये काही आशावर्कर यांनी देखील लाभ घेतला. तसेच आशा वर्कर चा गटप्रवर्तक स्वातीताई गोरे यांनी संपूर्ण केम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने मोतीबिंदू आणि काचबिंदू ऑपरेशन साठी जाणाऱ्या रुग्णांसाठी मोफत rt-pcr कोरोना चाचणी करून देण्याचे सौजन्य दाखवून उपस्थितांची मने जिंकली. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल रामदासी यांनी केले .
close