स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी प्रशासकीय अधिकारी यांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्या ऐवजी सरकारी रस्ता खुला व्हावा व मागास वर्गीय शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करावे - सतीष नीळ पाटील
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा : दि २९ / करमाळा तालुक्यातील निमगाव हवेली येथील जमीन गट नंबर ६९ पैकी हा गट मुख्य करमाळा- परंडा रस्त्या लगतच आहे. त्यामुळे त्यांना वेगळ्या रस्त्यांची गरजच नाही.व गट नंबर ६९ मध्ये यापूर्वीही व आजही रस्ताच नाही. या उलट निमगाव हवेली येथील पाटील वस्तीस जाणारा रस्ता गट नंबर ७४,७५,७६,७७,७८,७९ पैकी (पाटील वस्ती ) गाव नकाशात सरकारी रस्ता आहे. हाच सरकारी रस्ता अतिक्रमण करून मारुती नीळ व इतर लोकांनीच बंद करून या रस्त्यांवर ऊस लागवड केली आहे. त्यामुळे गावातील इतर शेतकऱ्यांना शेतात ये जा करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.
सदरील सरकारी रस्ता खुला होऊन मिळावा म्हणून गेल्या वर्षी पासून मंडळ अधिकारी सालसे यांच्या कडे सुनावणी सुरू आहे. त्याचा निकाल तात्काळ देण्यासाठीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करावे, विनाकारण खोटी माहिती घेऊन, शेतकरी संघटनेचे नाव घेऊन इतर शेतकरी बांधव यांना व कार्य कुशल अधिकारी यांच्या वर बिनबुडाचे आरोप करू नयेत.
शेतकरी संघटनेचे नेते यांनी अगोदर मारुती नीळ व इतर लोक यांनीच निमगाव हवेली येथील एका मागास वर्गीय शेतकऱ्याच्या शेतात जबरदस्तीने ओढा पात्र ढकलून गेल्या १५/२० वर्षा पासून अन्याय केला आहे तो ओढा पात्र जुन्या वहिवाटी प्रमाणे व्हावा म्हणून आंदोलन सुरू करावे. तो ही एक मागास वर्गीय शेतकरी बांधव आहे. त्यास न्याय मिळवून द्यावा. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही लोक यांनी माझे नाव नमूद करून रस्ता अडविला आहे अशी बातमी प्रसिद्ध केली आहे ती निखलास खोटी आहे व ज्यांनी सरकारी रस्ता अतिक्रमण करून बंद केला आहे त्या रस्ता चोरांना साथ देणारे आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी अगोदर खरी माहिती घेऊन बोलावे, मी पण एक शेतकरी आहे.
आपल्या संघटनेचे अध्यक्ष व नेते यांनी आज पर्यंत फक्त आणि फक्त शेतकरी बांधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आदिनाथ परबत यांनी अगोदर मारुती विनायक नीळ व इतर लोक यांनीच जो सरकारी रस्ता अतिक्रमण करून बंद केला आहे तो खुला होऊन मिळावा म्हणून आंदोलन करावे व खऱ्या साठी संघटनेचे नावाचा वापर करावा.प्रांत अधिकारी व तहसीलदार साहेब करमाळा यांनी सर्व सबंधित शेतकरी, व समक्ष स्थळ पाहणी करूनच न्याय निवडा आदेश दिलेला आहे. विनाकारण प्रशासकीय अधिकारी यांच्या वर बिनबुडाचे आरोप करून संघटनेच्या नावाचा गैर वापर करू नये असेही श्री . सतीष नीळ यांनी शेवटी म्हटले आहे.

