शिर्डी । प्रतिनिधी :
सध्या जगभरामध्ये कोरोना विषाणू (कोव्हीड19) या व्हायरसची साथ सुरु आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. त्यामुळे शिर्डी शहरातील बहुतांशी दुकाने/आस्थापना बंद आहेत. गेल्या सहा महिन्याच्या प्रतिक्षेनंतर दि.07 ऑक्टोंबर 2021 रोजी श्री साईबाबांच मंदिर उघडणार असल्याने संपूर्ण शिर्डी शहराचे नागरीकांचे सुरक्षेसाठी लसीकरण होणे आवश्यक आहे.
या अनुषंगाने मा.ना.श्री राधाकृष्णजी विखे पाटील व डॉ. सुजय दादा विखे पाटील यांचे विशेष प्रयत्नातून तसेच शिर्डी नगरपंचायत व ग्रामीण रुग्णालय, राहाता यांचे संयुक्त विद्यमाने ● संपुर्ण शिर्डी शहराचे लसीकरण होणेसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 5000 डोस उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. यासाठी शिडी शहरात प्रभागनिहाय पाच लसीकरण केंद्र उभारणेत आलेले आहेत. शिर्डी शहरातील उर्वरीत नागरीकांचे •लसोकरण व्हावे याकरीता दि. 1 ऑक्टोंबर ते 6 ऑक्टोंबर 2021 दरम्यान ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी ज्या नागरीकांचे लसीकरण झालेले नाही अशा सर्व नागरीकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा,
श्री साईबाबांचे मंदिर उघडलेनंतर शासनाचे नियमानुसार मंदिर प्रवेशासाठी व शिर्डी शहरातील सर्व खाजगी आस्थापना व दुकाने सुरु ठेवणेसाठी लसीकरणाचे दोन डोस घेणे बंधनकारक असण्याची शक्यता आहे. तरी शिर्डी शहरातील ज्या नागरीक/व्यवसायीक व दुकानात काम करणा-या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोनही डोस घेतलेले नसतील अशा नागरीक/व्यवसायीक/दुकानादारांनी या लसीकरण मोहीमेत सहभागी व्हावे असे आवाहन श्री शिवाजी गोंदकर, नगराध्यक्ष, श्री हरिश्चंद्र कोते. उपनगराध्यक्ष मा. मुख्याधिकारी व सर्व सन्माननीय सदस्यांनी केले आहे.

