शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतिनिधी दिपक हरिश्चंद्रे.
अहमदनगर - दि. ०१ सप्टेंबर
देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पालक शिक्षक संघ नियमानुसार गठीत करण्याचे शिक्षण विभागाने आदेश दिले आहेत.
देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणारे बेकायदेशीर पालक शिक्षक संघ तात्काळ बरखास्त करून शासन निर्णय मधील तरतुदीनुसार पालक शिक्षक संघाची स्थापना करणेत यावी. अश्या आशयाचे निवेदन आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी दि. २५ ऑगस्ट रोजी या शाळेत फी माफी साठी विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या ठिय्या आंदोलन प्रसंगी शाळेला निवेदन दिले होते.
आणि त्या निवेदनाची प्रत त्याच दिवशी मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांना इमेल द्वारे पाठविले होते.
सदर निवेदन मा. मुख्यमंत्री कार्यालयाने पुढील कार्यवाहीसाठी राज्याच्या शिक्षण विभागाला पाठविले होते. शिक्षण विभागाने आज या निवेदनावर नियमानुसार कार्यवाही करून तात्काळ अहवाल सादर करण्याबाबत अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सचिव आणि देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्य विद्यालयाचे मुख्याध्यापक यांना शिक्षण विभागाने लेखी आदेश दिले आहे.
Shirdi Express Live#(राहुरी- तालुका प्रतिनिधी ) बातम्या🗞️ आणि जाहिराती करीता संपर्क @दिपक हरिश्चंद्रे 📲7350591600

