*इंदापूर महाविद्यालयातील एनसीसीचे १६ छात्र विद्यार्थी प्रजासत्ताक दिन संचलनाच्या निवड शिबिरासाठी सहभागी होणार*
*हर्षवर्धन पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा*
इंदापूर प्रतिनिधी
दि. २६ जानेवारी २०२२ रोजी दिल्ली येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनासाठी देशभर निवड शिबिरे चालू होत आहेत. पुणे येथे होणाऱ्या निवड शिबिरासाठी इंदापूर महाविद्यालयातील एनसीसीचे (NCC) १६ छात्र विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार आणि संसदीय कार्यमंत्री आणि संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी एनसीसीच्या कॅडेट्सना शुभेच्छा दिल्या. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष राजपथावर चालण्याची संधी मिळावी अशी इच्छा यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे, एनसीसी अधिकारी लेफ्टनंट प्रा. डॉ. बाळासाहेब काळे व महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

