shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नीरा भीमा कारखान्यावरती शंकररावजी पाटील यांना अभिवादन*

*नीरा भीमा कारखान्यावरती शंकररावजी पाटील यांना अभिवादन* 
फोटो :- नीरा भीमा कारखान्यावरती शंकररावजी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन प्रसंगी अध्यक्ष लालासाहेब पवार व इतर.
इंदापूर: प्रतिनिधी (दि.१३ सप्टेंबर २०२१)
        शहाजीनगर (ता.इंदापूर ) येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्यावरती माजी खासदार, जेष्ठ नेते, कर्मयोगी शंकररावजी पाटील यांना १५ व्या स्मृती दिनानिमित्त कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार व मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन करून आज सोमवारी (दि. १३ ) अभिवादन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमात के. एस. खाडे यांचेही भाषण झाले. यावेळी कारखान्याचे संचालक दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, दादासो घोगरे, मच्छिंद्र वीर, कमाल जमादार, सुभाष पोळ, अतुल वाघमोडे, कार्यकारी संचालक डी. एन. मरकड, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
_________________________________

close