प्रतिनिधी, मोहन शेगर, सोनई
दि३१ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीचा आधारे सोन,ई पोलीसांनी कुरेशी मोहला चांदा येथे छापा टाकला असता या ठिकाणी आयशर व महिंद्रा टेंपो १२ जनावरे मिळवून आली अवैध रित्या घरच्या काही जनावरें बांधलेली दिसुन आली या छाप्यात एकुण २७ जनावरे ही कतली साठी गाड्यांत भरत असताना तीन इसमाना पकडण्यात आले त्याचे साथीदार अरुंद गल्लीचा फायदा घेत पसार झाले.
पकडलेल्या आरोपी कडुन ७;८३००० रू किमतीचे लाल काळे तांबडे विविध रंगांचे गाय गोरहे असे गोवशीय जनावरे आढळून आली एकुण २७ जनावरे आढळून आले वाहतूकीसाठी वापरत असलेल्या आयशर टेंपो एम एच १६ सीसी ८५१४ व महिंद्रा पिकं अप एम एच १७ बी डी ११२ असा एकुण १८;८३००० चा मुद्दैमाल जत करण्यात आला पाडलेले आरोपी अजहर ताहीर शेख वय २९ राहणार कूरेशी मोहल्ला चांदा जुनेद आबास शेख उर्फ कूरेशी वय२१ रा सुमित्रा काॅलनी शिरावा बाजार औरंगाबाद भगवान विष्णू धुमाळ वय ४७ राहणार लोहार वाडी रोड चांदा असे पकडण्यात आलेले आरोपी आहेत.
तर फरार झालेला ंईशान कादीर शेख रा चांदा शनि पठाण ंहे फरार झाले आहेत जुनेद कूरेशी विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत त्याच प्रमाणे ईशाद कादीर शेख यांच्या विरुद्ध सोन,ई व बेलवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत सदर आरोपीच्या ताब्यातून २७ जनावरांना तातडीने सुरक्षा देखभाल व संवर्धन पालणपोषणासाठी जय गोमाता सेवा भावी संस्था मढी ला पाथर्डी येथे पाठविण्यात आले पसार झालेल्या आरोपी विरुद्ध सोन,ई पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहेअटक आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आली सरदची कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोन,ई पोलीस करीत आहेत.

