प्रतिनिधी, मोहन शेगर, सोनई
सोनई--महाराष्ट्र राज्य पशुचिकित्सक सेवादाता असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय सभासद नोंदणी नुकतीच लांडेवाडी रोडलगत असलेल्या कार्यलयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांच्या हस्ते करण्यात आली.
या प्रसंगी गडाख म्हणाले,संघटनेच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम, शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी कार्य करणार असून या साठी शासकीय पातळीवर संघटनेसाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन श्री.गडाख यांनी दिले.
प्रस्ताविक व संघटनेची पार्श्वभूमी सचिव डॉ.राहुल काळे यांनी मांडली. नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. संतोष लांडे मनोगत व्यक्त करताना म्हणाले,नोंदणी झालेल्या सर्व सभासदांचा पाच लाखाचा विमा संरक्षण योजना ( अपघाती) राबविण्यात येऊन एक ओळख पत्र त्यांना देणार आहोत, असे लांडे यांनी मत व्यक्त केले.
याप्रसंगी जेष्ठ डॉ. नितीन पालवे,संघटनेचे अध्यक्ष डॉ. संतोष लांडे,उपाध्यक्ष अनिल कोरडे,खजिनदार डॉ. चंद्रकांत होन,डॉ. काकडे,यांच्यासह पदाधिकारी व परिसरातील पधुवैद्यक उपस्थित होते.आभार डॉ. अभिजित दरदले यांनी मानले.

