बावडा येथील शशिकांत जाधव यांची व्हॉइस अगेन्स्ट क्राईम अँड करप्शन या राष्ट्रीय संस्थेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड.
इंदापूर प्रतिनिधी: भारत सरकार मान्यताप्राप्त व्हॉइस अगेन्स्ट क्राईम अँड करप्शन या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मुकेश कुमार यांनी शशिकांत आप्पा जाधव राहणार बावडा तालुका इंदापूर यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड केली. असून त्यांना सामाजिक गैरव्यवहार ,मानवी हक्क, अधिकार, कर्तव्य ,शैक्षणिक हक्क ,बाल हक्क ,कामगार हक्क आणि कर्तव्य मूलभूत अधिकार स्री हक्क, राष्ट्रीय एकात्मता व एकता यासंबंधी प्रशासनास योग्य ते सहकार्य करण्याची भूमिका या माध्यमातून कार्य करण्यासाठी त्यांची पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष पदी निवड केली आहे. त्यांना नियुक्तीपत्र पोस्टामार्फत मिळाले असून सदर नियुक्तीबद्दल त्यांचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन करून सत्कार केला. यावेळी इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी चे सोशल मीडिया प्रमुख साहेबराव पिसाळ हे उपस्थित होते.
शशिकांत जाधव यांची पुणे जिल्हाा अध्यक्षपदी निवड झाल्याने बावडा गावातील विविध मान्यवरांच्या कडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

