shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निपक्षपणे लेखणीसाठी पत्रकारांना समाज व प्रशासनाने सहकार्य करावे--अनिल महाजन..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :- 


मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त मा.एस.एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व मराठी पत्रकार परिषदेचे राज्य प्रसिध्दि प्रमुख अनिलजी महाजन यांच्या मार्गदर्शनाखालीमराठी पत्रकार परिषदेचे उपजिल्हाप्रमुख विजय आरकडे , प्रा. हनुमंत भोसले, जेष्ठ पत्रकार धनंजय कुलकर्णी, झुंजार पत्रकार संघाचे अध्यक्ष, दशरथ चवरे, सचिव. दत्तात्रय हंडिबाग आदर्श पत्रकार संघाचे सहसचिव प्रकाश मुंडे  यांच्या उपस्थितीत पत्रकार श्रीराम तांदळे यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा तपासाअंती निकाली काढावा या मागणीसाठी आज मराठी पत्रकार परिषद,आदर्श पत्रकार संघ यांच्या वतीने  असंख्य पत्रकार बांधवांनी केज पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक श्री. शंकर वाघमोडे साहेब यांना निवेदन देण्यात आले.



यावेळी, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख  श्री.अनिलजी महाजन यांनी सांगितले कि पत्रकारांवर दाखल केलेला खोटा गुन्हा तपासाअंतीमागे घेवून निकाली काढावा तसेच पत्रकारांना निपक्षपणे बातम्या प्रकाशित करण्यासाठी पोलिस प्रशासनाने व समाजाचे सहकार्य लाभले पाहिजे.    तसेच यापुढे निपक्ष काम करण्यास पोलिस प्रशासनाने पाठबळ द्यावे,

यावेळी पत्रकार अनिल गलांडे, पत्रकार महादेव दळवी, पत्रकार नंदकुमार मोरे, चंद्रकांत पाटिल,पत्रकार प्रकाश मुंडे, रमेश इतापे, रमेश गुळ भिले, वाजेद शेख, गौतम बचुटे, दिनकर राऊत, धनंजय घोळवे, इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.

close