shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दरेवाडी गटातील हजारो कोरोना योद्धा यांचा सन्मान करणार - मनोज कोकाटे ..! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नगर तालुका भाजपाचा उपक्रम..!!


प्रतिनिधी : आसावरी वायकर

टाकळी काझी : दि . १७ / प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त भाजपा नगर तालुका व सरपंच मित्र मंडळाच्या वतीने नगर तालुक्यातील टाकळी काझी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करून सेवा व समर्पण अभियानास सुरुवात करण्यात आली.


यावेळी भाजपचे जेष्ठनेते, माजी जिल्हाध्यक्ष भानुदासजी बेरड, जिल्हा उपाध्यक्ष शामराव पिंपळे, जेष्ठनेते रमेशजी पिंपळे, महेशराव वाघ, शिक्षकनेते सुनीलजी पंडित सर, डॉ.निकरड, भाजपा तालुकाध्यक्ष तथा चिचोंडी पाटील गावचे सरपंच मनोजजी कोकाटे, उक्कडगावचे सरपंच नवनाथ म्हस्के, दशमी गव्हाणचे सरपंच बाबासाहेब काळे, मांडव्याचे सरपंच सुभाषजी निमसे, दरेवाडीचे सरपंच सुभाषजी बेरड, मदडगावचे सरपंच अनिलराव शेडाळे, निंबोडीचे सरपंच शंकरराव बेरड, कोल्हेवाडीचे उपसरपंच पोपटराव शेळके, नारायणडोह चे सरपंच किशोरजी गायकवाड, उपसरपंच पोपटराव बनकर, ग्रामपंचायत सदस्य अविनाशजी साठे सर, आठवडचे उपसरपंच भाऊसाहेब लगड, बाप्पूसाहेब बेरड, चिचोंडी पाटीलचे उपसरपंच भाऊसाहेब ठोंबरे, विजय गाडे, संतोष कोकाटे, बाळासाहेब बोरुडे, तुषार कोकाटे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश कांगुणे, डॉ.प्रियंकाताई शेंदूरकर, विकासजी वाघ आदी पदाधिकारी व पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा.बेरड सर यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर पर्यंत सेवा व समर्पण अभियानाचे आयोजन करण्यात आलेले असून त्याच धर्तीवर भाजपा नगर तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कोरोना योद्धाचा सन्मान हा स्तुत्य उपक्रम असून नरेंद्र मोदींच्या कार्याला शोभणारा आहे. निश्चितच या सन्मानामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढून त्यांना अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल.

या वेळी बोलताना कोकाटे यांनी सांगितले की, टाकळी काझी प्राथमिक आरोग्य केंद्र व चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांसह दरेवाडी गटातील सुमारे हजारो कोरोना योद्धाचा सन्मान या अभियाना अंतर्गत करण्यात येणार असून यामध्ये कोरोना काळामध्ये ज्या डॉक्टर, मेडिकल, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका मदतनीस, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत कर्मचारी, स्मशानभूमी कर्मचारी यांनी जिवावर उदार होऊन जनतेची सेवा केली अश्या सर्व सन्मानीय व्यक्तींचा सन्मान भाजपा नगर तालुक्याच्या वतीने करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष तथा चिचोंडी पाटील गावचे सरपंच मनोज कोकाटे यांनी केले.
close