बेलापूर येथील गुप्त धन प्रकरण..! जुन महिन्यात सापडले होते बेलापूर येथे गुप्तधन... स्व.सुनील गायकवाड सदर घटनेचा होता साक्षीदार..!!
श्रीरामपूर । प्रतिनिधी:-
बेलापूर येथील गुप्तधना मुळे जीव गमावणाऱ्या सुनील गायकवाड यांच्या गरीब कुटुंबांला मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे,आर पीआय चे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन,भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांच्या वतीने तीन महिने पुरेल एवढे किराणा सामान देण्यात आले.
त्याप्रसंगी काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष नानासाहेब मांजरे मनसे जिल्हा सचिव तुषार बोबडे मनविसे शहराध्यक्ष निलेश लांबोळे आदी उपस्थित होते.किराणा सामान देवुन या गरीब कुटुंबाला छोटासा आधार देण्याचा प्रयत्न मनसे, आर पी आय, भिम शक्ती, यांच्या वतीने करण्यात आला.
गायकवाड कुटुंब अतिशय गरीब व प्रामाणिक आहे,
आज त्या मुलांचे संगोपन करणे या काळात फार अवघड आहे. म्हणून त्यांना छोटी छोटी मुले असल्याकारणाने सर्व दानशूरांनी व राजकीय पक्षांनी तसेच सामाजिक संघटनांनी या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत करावी अशी विनंती सदर संघटनांनी केली आहे.

